‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्राजक्ताचं फॅन फॉलोइंगही मोठं आहे. आयुष्यात घडणाऱ्या विविध महत्वाच्या घडामोडी ती सोशल मिडियावरून चाहत्यांशी शेअर करत असते. पण आता तिने शेअर केलेला तिचा एक व्हिडीओ खूपच चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे एरवी बेधडक अंदाजात दिसणाऱ्या प्राजक्ताला यावेळी माईकसमोर बोलताना अश्रू अनावर झाल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा एक भावूक व्हिडीओ शेअर केला. यात स्टेजवर बोलता बोलता तिला रडू कोसळलं. याचं कारण होतं तिच्या आजोबांचं प्रथम पुण्यस्मरण. या व्हिडीओत प्राजक्ता भावूक होऊन स्टेजवर बोलताना दिसत आहे. तर ती बोलत असताना ‘धर्मवीर’ चित्रपटातील ‘गुरुपौर्णिमा’ हे गाणं ऐकू येत आहे.

आणखी वाचा : Video: प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहीलं, “आज आजोबांचं प्रथम पुण्यस्मरण… वर्षश्राध्द… आज पहिल्यांदाच माईक समोर तोंडातून शब्द फुटण्या ऐवजी डोळ्यातून पाणी येत होतं… कारण अजूनही खरं वाटत नाही की आजोबा आपल्यामध्ये नाहीत. ज्यांनी आयुष्यभर पांडुरंगाची सेवा केली, आमच्यावर धार्मिक, अध्यात्मिक संस्कार केले ते कायमच आमचे आधारस्तंभ राहतील. आज वर्ष झालं तरी सगळ्यांच्या डोळ्यात, मनात तुमच्या आठवणी कायम आहेत आजोबा. तुम्हाला आदरपूर्वक श्रध्दांजली. आज जयश्रीताई तिकांडे यांचं किर्तन ठेवलं होतं. अगदी सरळ, साध्या, पण मार्मिक शब्दांत ताईंनी किर्तन केलं. ताई तुमचे मनापासून आभार. तुमचे किर्तन ऐकून कान अगदी तृप्त झाले. ||राम कृष्ण हरी ||”

हेही वाचा : Video: डर के आगे जीत है! प्राजक्ता गायकवाडने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “आधी खूप घाबरले आणि…”

प्राजक्ताचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर तिचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहीलं, “एखाद्या सिने अभिनेत्रीने आपल्या घरी कीर्तन ठेवलंय हे मी तर पहिल्यांदाच पाहिलं.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “हा ठेवा मोठा आहे, हा आशिर्वाद मोठा आहे, आजन्म आहे. अशाच कायम प्रेमळ रहा.” तर आणखी एकाने लिहीलं, “खरंतर आपल्यावर संस्कार करणारे आजी आजोबाच असतात. तुमच्यावर सुद्धा खूप उत्तमप्रकारे संस्कार झालेले आहेत हे वेळोवेळी आम्हला जाणवतं. आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली. असेच कायम आपली संस्कृती जपत राहा.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajakta gaikwad gets emotional in the memories of her grandfather rnv
First published on: 02-03-2023 at 16:13 IST