नायिका असो किंवा सर्वांना त्रास देणारी खलनायिका, कधी गोड तर कधी खाष्ट सासू अशा विविधांगी भूमिका साकारून अभिनेत्री सुलेखा तळवलकर घराघरांत लोकप्रिय झाल्या. त्यांचा छोट्या पडद्यावरील चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेत्रीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या सुलेखा तळवलकर त्यांच्या युट्यूब चॅनेलमुळे चर्चेत असतात. त्यांच्या ‘दिल कें करीब’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. याशिवाय सुलेखा सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असतात. त्यांनी नुकतीच शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

सुलेखा तळवलकर यांनी नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांची लेक टिया (Tia )चं कौतुक केलं आहे. सलग दोन वर्षे टियाला कॉलेजमध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यांच्या लाडक्या लेकीचा दादर कॅटेरिंग कॉलेजमध्ये सन्मान केला असल्याचं या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : हजारो कोटींचा मालक, तरीही सलमान खान १ BHK घरात का राहतो? भाईजानचं गॅलेक्सी अपार्टमेंटशी आहे खास नातं

सुलेखा तळवलकर पोस्टमध्ये लिहितात, “प्रिय टिया, मला वाटतं मी या जगातील सर्वात जास्त भाग्यवान आणि आनंदी आई आहे. एखाद्या आईला हवी असतात अगदी तशीच माझी मुलं आहेत. बाळा, गेल्या काही वर्षांत तू स्वत:ला हुशार, सुंदर, मोहक, आधुनिकतेने चालणारी, प्रतिभावान व्यक्ती म्हणून तयार केलं आहेस. तुझ्या कौशल्यांची यादी खरंच न संपणारी आहे. तू खरंच अविश्वसनीय यश संपादन केलंस. तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे बाळा.”

हेही वाचा : Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”

“सलग २ वर्षे ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा पुरस्कार जिंकल्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन पिल्लू…देव तुझ्या पाठीशी सदैव राहो. आयुष्यात अशीच उंच भरारी घेत राहा. मला माहितीये तू नक्कीच यश मिळवशील…लव्ह मम्मा” अशी पोस्ट सुलेखा यांनी लेकीसाठी लिहिली आहे.

दरम्यान, सुलेखा तळवलकरांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. यामध्ये त्यांनी सीमा मुकादम हे पात्र साकारलं आहे.