‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे अभिनेता अमित भानुशाली घराघरांत लोकप्रिय झाला. यामध्ये त्याने अर्जुन हे मुख्य पात्र साकारलं आहे. मालिकेमुळे अमितचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने नुकतीच शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेत आली आहे.

अलीकडच्या काळात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. सामान्य लोकांपासून कलाकारांपर्यंत प्रत्येकाला याबद्दलचे अनुभव येत आहेत. असाच काहीसा अनुभव ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीला आला.

अमितच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून एका युजरने पैसे लुबाडण्याचा प्रयत्न केल्याचं अभिनेत्याच्या वेळीच लक्षात आलं. यासंदर्भात त्याने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. संबंधित स्कॅमरने अमित भानुशालीच्या नावाने बनावट अकाऊंट ओपन करून त्याच्या चाहत्यांकडे डोनेशनची मागणी केली आहे. परंतु, प्रत्यक्षात या घटनेबद्दल अमितला काहीच माहिती नव्हती. घडला प्रकार समजल्यावर अभिनेत्याने इन्स्टा पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा : धक्कादायक! देवोलीनाच्या मित्राची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या, पंतप्रधान मोदींकडे केली मदतीची मागणी

बनावट अकाऊंट तयार केलेला युजर अमितच्या चाहत्यांकडे पैसे मागत असल्याचं या स्क्रीनशॉटमध्ये पाहायला मिळत आहेत. यावर अभिनेता लिहितो, “मला या डोनेशनबद्दल काहीच माहिती नाही. कृपया कोणीही पैसे पाठवू नका. सावधान राहा…हे अकाऊंट माझं नाहीये.”

हेही वाचा : जामनगरमध्ये रिहानाची ‘ती’ कृती पाहून सगळेच भारावले, गायिकेबद्दल नेटकरी म्हणाले, “बॉलीवूड सेलिब्रिटींनी हिच्याकडून…”

अमित भानुशाली

दरम्यान, अमित भानुशालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत तो प्रमुख भूमिका साकारत आहे.