‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून गुढीपाडव्याचा सीक्वेन्स चालू होता. गेल्या भागात गुढीची पूजा करताना मालिकेत अर्जुनच्या जुन्या मैत्रिणीची एन्ट्री झाली होती. त्याची मैत्रीण मानसी परदेशातून एका केसच्या कामानिमित्त भारतात आलेली आहे. या मानसीची केस अर्जुन लढणार असतो. ‘बिग बॉस’च्या माध्यमातून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुचिरा जाधव ‘ठरलं तर मग’मध्ये मानसीच्या रुपात झळकत आहे. नवऱ्याच्या जिवलग मैत्रिणीने अचानक एन्ट्री घेतल्याने याचा अर्जुन-सायलीच्या नात्यावर काय परिणाम होणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

अर्जुन मानसीला प्रेमाने ‘मन्या’ अशी हाक मारतो. तर, मानसी अर्जुनला ‘जुजू’ आणि कल्पनाला ‘कल्पू आंटी’ अशी हाक टोपणनावाने हाक मारत असते. मानसीचा एकंदर सुभेदारांच्या घरातील मनमोकळेपणाने केलेला वावर पाहून सायली आश्चर्यचकित होते. मानसी अर्जुनसह सुभेदारांच्या फारच जवळची आहे असा विचार करून सायलीचा जळफळाट होतो. शेवटी सायली काहीतरी करून आपण अर्जुनला इम्प्रेस करायचं असं ठरवते.

हेही वाचा : “तुम्हाला किडनॅप करून घेऊन जातील”, अमृता खानविलकरने सांगितला शूटिंगचा भयानक किस्सा; म्हणाली, “गुन्हेगारी, बेरोजगारी…”

रुचिराने निळ्या रंगाच्या वनपीसमध्ये एन्ट्री घेतल्याचं ‘ठरलं तर मग’मध्ये दाखवण्यात आलं होतं. पुढे, मानसी अर्जुनला तू एवढ्या साध्या मुलीशी का लग्न केलंस असं विचारते. याचदरम्यान, अर्जुन आणि मानसीचं संपूर्ण संभाषण सायली खोली बाहेरून ऐकते. ती नवऱ्याला काहीतरी सरप्राइज द्यायचं अशा विचाराने स्वत:चा लूक बदलण्याचा निर्णय घेते.

हेही वाचा : भारतीय कर्णधार रोहित शर्माला भेटल्या ‘मुरांबा’ फेम रमा अन् रेवा, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंबरोबरचे फोटो व्हायरल

अर्जुनसाठी खास शॉर्ट काळ्या रंगाचा वनपीस, त्यावर उंच चपला असा वेस्टर्न लूक करून सायली येते. परंतु, नेहमीच साधेपणात राहणाऱ्या सायलीला या कपड्यांमध्ये खूपच वेगळं वाटत असतं. अर्जुन प्रथमदर्शनी तिच्याकडे पाहून हसतो. नवरा हसतोय हे पाहून सायलीच्या डोळ्यात पाणी येतं. सायली निघून जात असताना अर्जुन हात धरून सायलीला अडवतो आणि मिसेस सायली तुम्ही आहात तशाच खूप छान दिसता याची जाणीव तिला करून देतो.

दरम्यान, मानसीच्या येण्याने अर्जुन-सायलीच्या नात्याची गणितं दिवसेंदिवस बदलत जात असल्याचं गेल्याकाही भागांमध्ये पाहायला मिळालं. आता दोघेही एकमेकांना प्रेमाची कबुली केव्हा देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मालिकेचा हा विशेष भाग १२ एप्रिल रोजी प्रसारित करण्यात येणार आहे.