‘पिया रंगरेज’ फेम लोकप्रिय टीव्ही अभिनेता गौरव बजाज दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी साक्षीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. गौरव व साक्षी ११ एप्रिल रोजी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. दोघांना तीन वर्षांचा मुलगा व्योम असून आता त्यांना मुलगी झाली आहे. चैत्र नवरात्रीत मुलीचा जन्म झाल्याने अभिनेत्याने आनंद व्यक्त केला आहे.

गौरवने लेकीच्या जन्मानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. “आम्ही खूप आनंदी आहोत. आमचं कुटुंब आता पूर्ण झालं आहे. चैत्र नवरात्रीत आमच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. नवरात्रीच्या शुभ दिवसात बाबा झाल्याचा आनंद वेगळाच आहे. साक्षी आणि बाळ दोघांची प्रकृती उत्तम असून संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे,” असं ‘बॉम्बे टाइम्स’ शी बोलताना गौरव म्हणाला.

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी आणि विजयने…”

“माझा मुलगा व्योमचा जन्म तीन वर्षांपूर्वी ११ डिसेंबरला झाला होता आणि आता माझ्या मुलीचा जन्म ११ एप्रिलला झाला आहे. मला वाटतं ११ क्रमांक आमच्यासाठी शुभ आहे. चिमुकला व्योम सतत त्याच्या बहिणीच्या पाळण्याभोवती फिरतोय. आता तो मोठा भाऊ झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी साक्षीची काळजी घेत होतो, आता मी बाबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यग्र होईन. मुलाला खेळायला जागा असावी यासाठी गेल्या वर्षीच आम्ही नवीन घर घेतलं. आता माझी दोन्ही मुलं तिथं खेळतील,” असं गौरव म्हणाला.

प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

गौरव बजाजबद्दल बोलायचं झाल्यास तो टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने ‘मेरी गुडिया’, ‘जनम जनम का साथ’, ‘सपनों से भरे नैना’, ‘सिद्धी विनायक’, ‘ये है आशिकी’, ‘छोटी सरदारनी’, ‘उतरन’ अशा अनेक मालिकांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.