लोकप्रिय टीव्ही रिॲलिटी शो ‘इंडियन आयडल’ च्या १४ व्या पर्वाला विजेता मिळाला आहे. कानपूरच्या वैभव गुप्ताने शोची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. अनेक आठवड्यांच्या स्पर्धेत खूप साऱ्या व चढ-उतारानंतर कानपूरच्या वैभवने सर्वाधिक मतं मिळवली व तो विजेता ठरला. इतर स्पर्धकांना मागे टाकत वैभवने ट्रॉफी व बक्षीस जिंकले.

अंतिम फेरीत वैभवसोबत आणखी पाच स्पर्धक होते. त्या यादीत अनन्या पाल, अंजना, आद्य मिश्रा, पियुष पनवार, सुभादीप दास यांचा समावेश होता. या सर्व स्पर्धकांना शोमध्ये प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. पियुष पनवारने आपल्या गायनाने संजय दत्तचं मन जिंकलं होतं. त्याच्या गाण्याने प्रभावित होऊन संजू बाबानेही त्याला मिठी मारली होती. पण आता फिनालेमध्ये वैभवला लोकांचे सर्वाधिक प्रेम मिळाले असून त्याने हे पर्व जिंकलं आहे.

१३ वर्षांच्या मेहनतीचं फळ! मनीषा रानीचा मराठमोळा कोरिओग्राफर भावुक; १० लाख जिंकल्यावर म्हणाला, “एकवेळ…”

‘इंडियन आयडल १४’ चा विजेता ठरल्यावर वैभवला २५ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत, तसेच त्याचा नवी कोरी कारही मिळाली आहे. उपविजेत्यांनाही बक्षिसं देण्यात आली आहे.

Video: हम साथ साथ है! बच्चन कुटुंबाच्या तीन पिढ्यांची एकत्र अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला हजेरी, जया बच्चन मात्र…

‘इंडियन आयडॉल १४’ चे परीक्षक विशाल ददलानी, कुमार सानू आणि श्रेया घोषाल होते. या तिघांनी ऑडिशनमधून स्पर्धक निवडण्यापासून ते फिनालेपर्यंत स्पर्धकांच्या परफॉर्मन्सचं परीक्षण केलं. शोच्या ग्रँड फिनालेमध्ये खास पाहुणे म्हणून नेहा कक्कर व सोनू निगम ग्रँड झळकले. अखेर इतक्या महिन्यांच्या रोमांचक सफरनंतर वैभव गुप्ताने विजेता म्हणून बाजी मारली.