आनंद महिंद्रा हे भारतातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक आहेत. ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. ते एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून विविध प्रकारचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. भारतातील प्रतिभावान लोकांचं ते खूपदा कौतुक करत असतात. आनंद महिंद्रा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये खूप कमी दिसतात, पण नुकतीच त्यांनी अनंत अंबानींच्या प्री वेडिंगला हजेरी लावली. पत्नीसह ते जामनगरला गेले होते, तिथला त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा तीन दिवसीय प्री-वेडिंग सोहळ्याचा रविवारी समारोप झाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी व पाहुणे सोमवारी जामनगरहून रवाना झाले. सोमवारी दुपारी आनंद महिंद्रादेखील पत्नीसह माघारी परतले, यावेळचा त्यांचा व्हिडीओ चर्चेत आहे. व्हिडीओ आनंद महिंद्रा व त्यांची पत्नी अनुराधा दोघेही छान दिसत आहेत. व्हिडीओत दोघांचाही स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला.

जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडच्या आजोबांची अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला हजेरी, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे व्हिडीओ आले समोर

चाहते या व्हिडीओवर ‘जेंटलमन’ अशा कमेंट्स करत आहेत. अनुराधा यादेखील व्हिडीओत खूप सुंदर व स्टायलिश दिसत आहेत. सेलिब्रिटींच्या गोतावळ्यातही त्या लक्ष वेधून घेतात. दरम्यान, अनुराधा यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्या पत्रकार असून ‘मेन्स वर्ल्ड’ या मॅगझीनच्या संपादक आहेत. त्या केसी महिंद्रा ट्रस्टच्या माध्यमातून गरीब मुलांसाठी काम करतात. या जोडप्याला दिव्या व अलिका नावाच्या दोन मुली आहेत.