स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विठुमाऊली’ मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. कधी कलाकारांना पत्र पाठवून तर कधी सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन चाहते या मालिकेविषयीचं प्रेम व्यक्त करत असतात. चाहत्यांच्या याच प्रेमापोटी विठुमाऊली टीआरपीचे उच्चांग गाठत आहे. असाच एक थक्क करणारा अनुभव नुकताच विठुमाऊलीच्या कलाकारांनी घेतला. कोकणातून काही खास चाहते मंडळी या कलाकारांना भेटण्यासाठी मुंबईत फिल्मसिटीमध्ये असलेल्या विठुमाऊलीच्या सेटवर पोहोचली. लाडक्या कलाकारांना भेटण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. इतकंच नाही तर विठुमाऊलीच्या कलाकारांसाठी त्यांनी खास भेटही आणली होती.

चाहत्यांचं हे प्रेम पाहून रुक्मिणीची भूमिका साकारणारी एकता लब्दे भारावून गेली होती. कौतुकाची ही थाप नवं काहीतरी करण्याचं बळ देते. विठुमाऊली मालिकेमुळे मी देशभरात पोहोचले याचा विशेष आनंद वाटतो असं एकता लब्देने सांगितलं.

Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
मोहिते-पाटील यांच्या भूमिकेकडे साऱ्यांच्या नजरा

Video : ‘राजश्री प्रॉडक्शन्स’च्या ‘हम चार’चा ट्रेलर पाहिलात का?

‘विठुमाऊली’ मालिकेमधून विठुरायाच्या दिव्यत्वाची प्रचिती प्रेक्षकांना मिळत असते. भक्तीचा हा प्रवास उत्तरोत्तर रंजक होणार आहे. ‘विठुमाऊली’ ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता प्रसारित होते.