बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू होऊन दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या त्याच्या राहत्या घरात सुशांतचा मृतदेह आढळून आला होता. सुशांत सिंहच्या मृत्यूला इतका काळ उलटला असला तरी त्याचे चाहते अद्याप त्याला विसरु शकलेले नाही. सुशांतचे अनेक चाहते त्याची आठवण काढताना दिसत असतात. त्याचे जुने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते सुशांतच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच सुशांतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत तो बॉलिवूड निर्माता करण जोहरला मिठी मारताना दिसत आहे.

सुशांत सिंह राजपूतचे निधन झाल्यानंतर बराच काळ लोटला आहे. मात्र तरीही तो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. सुशांतने त्याच्या सिनेसृष्टीच्या करिअरची सुरुवात पवित्र रिश्ता या टीव्ही शो द्वारे केलो होती. त्यानंतर त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याचा पहिला काइ पो चे या चित्रपटाद्वारे त्याला नवीन ओळख मिळाली. हा चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला. त्यानंतर त्याने पीके, एम एस धोनी, केदारनाथ यांसारख्या अनेक चित्रपटातून चाहत्यांची लोकप्रियता मिळवली. सुशांतने दमदार अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
आणखी वाचा – सुशांत सिंहच्या वाढदिवसानिमित्त रिया चक्रवर्तीने शेअर केली पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष

Hindu Muslim binary In Narendra Modi lone Muslim MP Choudhary Mehboob Ali Kaiser
एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य

पण २०२० मध्ये त्याच्या मृत्यूनंतर सर्वांनाच धक्का बसला होता. त्याच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडलं होतं. मुंबईतील राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये मोठा बदल झाला होता. ड्रग्जचे सेवन करण्यापासून बॉलिवूडमधील घराणेशाही यावर अनेक खुलासेही झाले. त्यामुळे सिनेसृष्टीतील कामावर अनेक प्रश्न उभे राहिले, जे आजही कायम आहेत. दरम्यान त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इंडियाज गॉट टॅलेंट या कार्यक्रमादरम्यानचा आहे. या व्हिडीओत करण जोहर, सारा अली खान, मलायका अरोरा, भारती सिंग हे सर्व कलाकार दिसत आहे.

“…तोपर्यंत त्याच्या जीवनावर चित्रपट बनवू नये”; सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीची पोस्ट व्हायरल

या व्हिडीओत सुशांत सिंह सर्व कलाकारांसोबत मजा मस्ती करताना दिसत आहे. यात तो धावत जाऊन निर्माता करण जोहरला मिठी मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ त्याच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये ऋत्विक धनजानी आणि सुशांत यांच्या शर्यत लागल्याचेही दिसत आहे. या व्हिडीओत सुशांतची स्टाईल त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. या व्हिडीओवर त्याचे अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतानाही पाहायला मिळत आहे.