बॉलिवूडमधील आघाडीचे तीन खान यांच्याबरोबर काम करण्याचे प्रत्येक नव-अभिनेत्रीचे स्वप्न असते. ‘स्टुडंट ऑफ दी इयर’ चित्रपटाद्वारे सिनेसृष्टित आगमन केलेल्या अलिया भटने रणदीप हुडासारख्या अभिनेत्याबरोबर काम केले असले, तरी बॉलिवूडच्या तीन सुपरस्टार खानसमवेत काम न करण्याचा सध्यातरी विचार असल्याचे तिने बोलून दाखविले. बॉलिवूडचे आघाडीचे खान त्रिकुट त्यांच्या चाळीशी पल्याड असून, २१ वर्षीय अलिया भटला या तीन सुपरस्टारसमवेत काम करण्यासाठी आपण अधिक प्रगल्भ अथवा प्रौढ दिसणे गरजेचे असल्याचे वाटते. आपण अद्याप छोटे दिसत असल्याचे ‘स्टुडंट ऑफ दी इयर’ अभिनेत्रीचे मानणे आहे. याविषयीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, वयाच्या मानाने मी खूप छोटी दिसत असल्याने, पडद्यावर निश्चितच खूप लहान दिसते. माझा चेहरा एखाद्या लहान मुलीसारखा आहे. ‘स्टुडन्ट ऑफ दी इयर’ चित्रपटानंतर माझ्या कामात आणि दिसण्यात हळूहळू प्रगल्भता येत आहे. तुम्हालासुद्धा यातील फरक जाणवत असेल. जेव्हा मोठ्या पडद्यावर छोट्याशा मुलीसारखी न दिसता, मी प्रौढ स्त्रीसारखी दिसेन त्यावेळी हे शक्य होईल. असे असले तरी, मी रणदीप हुडाबरोबर चित्रपट केलेला आहे. ज्यात मी विनामेकअप खूप तरूण दिसले. जे निश्चितच वाईट नव्हते. जर अशी संधी किंवा अशाप्रकारची व्यक्तिरेखा अथवा भूमिका मिळाली तर हे शक्य होऊ शकते. वरूण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रासारख्या तरूण अभिनेत्यांबरोबर काम केलेल्या आलियाने, अद्याप शाहरूख खान, सलमान खान आणि आमिर खान या बॉलिवूडमधील तीन सुपरस्टार खानबरोबर काम करणे बाकी आहे.