लोकसभा निवडणुकीआधी अभिनेते व भाजपाचे गोरखपूरचे खासदार रवी किशन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अपर्णा ठाकूर नावाच्या महिलेने सोमवारी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेतली. तिने रवी किशनची पत्नी असल्याचा दावा केला आहे. अभिनेत्यापासून आपल्याला मुलगी असून आरोप केला आणि त्यांनी तिचा स्वीकार करावा, अशी मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपर्णा ठाकूरने दावा केला की १९९६ मध्ये तिने कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत रवी किशन यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी असून ते आता आपल्या सर्वांसमोर स्वीकारत नसल्याचं म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत या महिलेबरोबर एक मुलगीही होती. रवी किशन आपल्या संपर्कात आहे, पण ते सार्वजनिकरित्या आपल्याला स्वीकारत नाही व मुलीशी ओळख दाखवत नाही, असंही तिने म्हटलं आहे.

लिव्ह इनचा सल्ला देणाऱ्या झीनत अमानवर भडकल्या मुमताज; म्हणाल्या, “ती मजहर खानला लग्नाआधी…”

आपल्या मुलीला रवी किशन यांची मुलगी असण्याचे सर्व अधिकार मिळायला हवेत, अशी मागणी या महिलेने केली. अपर्णा ठाकूरने काही फोटोही शेअर केले ज्यात रवी किशन एका चिमुकल्या मुलीबरोबर दिसत आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना शिनोव्हा नावाची ही मुलगी म्हणाली, “मी १५ वर्षांचे असताना मला कळालं की रवी किशन माझे वडील आहेत. पूर्वी मी त्यांना काका म्हणायचे. माझ्या वाढदिवसाला ते आमच्या घरी यायचे. मी त्यांच्या कुटुंबालाही भेटले आहे. वडील म्हणून ते माझ्यासाठी कधीच उपलब्ध नव्हते. त्यांनी मला त्यांची मुलगी म्हणून स्वीकारावं असं मला वाटतं, आईने त्यांना खूपदा म्हटलं की त्यांनी मला स्वीकारावं, पण ते स्वीकारत नाहीयेत. चार वर्षांपासून आमची त्यांच्याशी भेट झालेली नाही. त्यामुळे आता आम्ही न्यायालयात जाणार आहोत.”

“ते आधीच विवाहित होते,” लग्न गुपित ठेवण्याबद्दल अरुणा इराणींचा खुलासा; मूल होऊ न देण्याबाबत म्हणाल्या, “तो निर्णय…”

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अद्यात रवी किशन किंवा त्यांच्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर अपर्णा ठाकूर नावाच्या महिलेने व या मुलीने केलेल्या दाव्यांमुळे रवी किशन चर्चेत आले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman claims to be wife of bjp mp ravi kishan brings daughter asks for social acceptance hrc