७० च्या दशकातील दिग्गज अभिनेत्री झीनत अमान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांच्या काळात एकापेक्षा एक सरस चित्रपटांचा भाग राहिलेल्या झीनत यांची गणना ७०च्या दशकातील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते. त्या सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असतात व आपली मतंही मांडत असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट करत जोडप्यांना लग्नाआधी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. यावर आता अभिनेत्री मुमताजने प्रतिक्रिया दिली आहे.

झीनत अमान यांचा हा सल्ला चुकीचा असल्याचं त्या म्हणाल्या. काही महिने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहूनही तुमचं लग्न यशस्वी होईल याची काय गॅरंटी आहे? असा प्रश्न मुमताज यांनी विचारला आहे.

काय म्हणाल्या होत्या झीनत अमान?

नुकतेच झीनत अमान यांनी एका मुलाखतीत तरुणाईला सल्ला दिला होता. जोडप्यांनी लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहायला हवं, यामुळे तुम्हाला संबंध सुधारण्याची व पारखण्याची संधी मिळते, असं त्या म्हणाल्या होत्या. झीनत यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. यानंतर आता झीनत यांच्या काळातील अभिनेत्री मुमताज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“ते आधीच विवाहित होते,” लग्न गुपित ठेवण्याबद्दल अरुणा इराणींचा खुलासा; मूल होऊ न देण्याबाबत म्हणाल्या, “तो निर्णय…”

लग्नच करू नका – मुमताज

झूमला दिलेल्या मुलाखतीत मुमताज म्हणाल्या, “मी झीनतच्या लिव्ह-इनच्या सल्ल्याशी सहमत नाही. तुम्ही कितीही लिव्ह-इनमध्ये राहिलात, महिनोंमहिने एकत्र राहिल्यानंतर लग्न यशस्वी होईलच याची शाश्वती काय? मी तर म्हणते की लग्नच करू नये, आजच्या काळात स्वतःला त्या बंधनात बांधून ठेवायची काय गरज आहे? बाळासाठी? मग जा बाहेर पडा आणि योग्य व्यक्ती शोधा आणि लग्न न करता बाळ करा. काळ खूप पुढे गेला आहे. तुमच्या मुलींना आता पुरूषाची गरज नाही असं सांगत मोठं करा. मी ४० वर्षांपासून विवाहित आहे, लग्न टिकवावं लागतं, ते सोपं नाही.”

दिव्या भारतीने निधनाआधी दारू प्यायली होती, अभिनेता कमल सदानाचे विधान; म्हणाला, “आम्ही एकत्र शूटिंग…”

या सल्ल्यामुळे फॉलोअर्स वाढणार नाही – मुमताज

पुढे मुमताज म्हणाल्या, “झीनतने विचार करायला हवा की ती काय सल्ला देत आहे? सोशल मीडियावर ती अचानक इतकं मोठं विधान करतेय, एक ‘कूल’ आंटी दिसण्यासाठी तिचा उत्साह मी समजू शकते. पण असा सल्ला दिल्याने तुमचे फॉलोअर्स वाढणार नाहीत. मुलांनी लिव्ह-इन संस्कृती स्वीकारली तर भविष्यात लग्न होणार नाहीत. मला प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न अशा मुलीशी कराल का जी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती हे तुम्हाला माहीत आहे. झीनतचेच उदाहरण घ्या, ती मजहर खानला लग्नाआधी अनेक वर्षांपासून ओळखत होती. पण तरी तिचा लग्नाचा अनुभव वाईट राहिला. त्यामुळे मला वाटतं की तिने नात्यांबद्दल सल्ला देऊच नये,’’