टीव्ही मालिकांमधील पटकथांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे अशी चर्चा अनेकदा आपण ऐकतो. अनेकदा या मालिकांमधील संभाषणांची खिल्ली देखील उडवली जाते. त्यांच्यावरील मिम्स व्हायरल होतात. परंतु संगीतकार यशराज मुखाते याने एक पाऊल पुढे जाऊन चक्क मालिकेतीन संभाषणावर एक रॅप साँगच तयार केलं आहे. या विनोदी गाण्याचा गंमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अवश्य पाहा - सेम टू सेम; हुबेहुब WWE सुपरस्टार्ससारखे दिसतात हे सेलिब्रिटी View this post on Instagram First World Problems Made Kokila Ben sing this time I love doing harmonies, enjoyed this one a lot • Kahi share karoge toh credits zaroor dena. Aapke pyaar ke liye bohot saara dhanyawaad! #dialoguewithbeats #kokilaben #gopibahu #rashi #cooker #saathnibhanasaathiya #yashrajmukhate #ymstudios A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate) on Aug 20, 2020 at 8:51am PDT तारक मेहतामध्ये ‘या’ ग्लॅमरस अभिनेत्रीची एण्ट्री; साकारणार अंजली भाभीची भूमिका यशराजने तयार केलेलं हे गाणं 'साथिया साथ निभाना' या मालिकेतील एका सीनवर आधारित आहे. या सीनमध्ये कोकिलाबेन नावाची एक सासू आपल्या सूनेला अर्थात गोपी बहुला जाब विचारत आहे. संभाषणादरम्यान या दोन व्यक्तिरेखा जे शब्द उच्चारतात त्यावर हे रॅप साँग तयार करण्यात आलं आहे. 'साथिया साथ निभाना' ही स्टार प्लस वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका होती. या मालिकेतील अनेक दृश्यांवर आजवर मिम्स व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर यशराजने तयार केलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. View this post on Instagram Musician and viral sensation @yashrajmukhate spoke to @sanafarzeen about his viral Kokila video, becoming an overnight star and being followed by popular celebs. Yashraj also shared more about his love for music and his future plans . . . . . . #yashraj #yashrajmukhate #yashrajmukhatevideo #ymoriginal #ymstudios #kokilaben #kokilavideo #saathnibhanasaathiya #saathiya #kokilabenfunny #kokilabenmemes #instagramlive #instalive #dialogueswithbeat #dialoguewithbeats #uchhlingomachlingo #tinkatinkabarsa #howsthejosh A post shared by Indian Express Entertainment (@ieentertainment) on Aug 22, 2020 at 7:55am PDT इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत यशराजने हे गाणं तयार करताना आलेला अनुभव सांगितला. तो म्हणाला, "केवळ मजा म्हणून मी गाणं तयार केलं होतं. मला अपेक्षा नव्हती की प्रेक्षकांना हे गाणं इतकं आवडेल. गेल्या दोन दिवसांपासून मला सातत्याने फोन येत आहेत. या एका व्हिडीओमुळे जवळपास २५ हजार फॉलोअर्स माझे वाढले आहेत. माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय अनुभव होता."