ओठावरच्या लिपस्टिकच्या रंगसोबत बॉयफ्रेंड बदलणारी ती. सॉरी… काहींना हे वाक्य जाम खटकू शकत. कदाचित काही मुलींच्या भावना देखील यामुळे दुखावतील. पण या समाजात जो उघड्या डोळ्यांनी वावरतो तो हे वाक्य खोडण्याचा प्रयत्न नक्कीच करणार नाही. कारण या वर्गातील खंडीभर मुली तुम्हाला सहज भेटतील. आता समाजातील प्रथेनुसार ती छत्तीस नखरेवाली, ओवाळून टाकलेली, याड लावणारी किंवा भंपक पोरगी अशी कोणतीही उपमा देऊन तिच्या चारित्र्याचे धिंडोरे काढण्याचा वेडेपणा मला निश्चितच करायचा नाही. पण तिची कहाणी म्हणजे एक रंग बदलणार रसायन असल्याची अनुभूती तुम्हाला नक्कीच येईल. ती कोण? सध्या ती काय करते? असे काही प्रश्नही कदाचित मनात येतील. विचार करायला हरकत नाही, पण तिचा शोध घेण्याची गरज नाही. कारण ‘तू माझा विचार करु शकतोस, पण मी अशी का? या प्रश्नाच उत्तर शोधू नकोस’ हे तिच्या जगण्याच ब्रीदवाक्य होतं.

बघता क्षणी नजरेत भरावी, अशीच होती ती. लैला तिच नाव. ‘बडे बाप की बिघडी हुई औलाद…’ असं तिच्या बाबतीत म्हणता येणार नाही. कारण ती सर्वसामान्य कुटुंबातलीच होती. कॉलेजमधील तिची एन्ट्री भल्याभल्यांना घायाळ करुन सोडायची. पक्याच्या नजरेत ती पडली अन् तो घायाळ झाला. कॉलेजच्या कॅंटीनमध्ये पक्याने टाकलेला कटाक्ष तिने कॅच जरुर केला. पण प्रेमाची मॅच सुरु करण्यासाठी महत्त्वाची असणारी स्माइल तिने राखून ठेवत, आपल्या तोऱ्यात निघून गेली. दोघांच्यातील हा प्रकार पक्याच्या मित्रांनी लगेच हरला. अन् त्यांनी पक्याच मजनू असं नामकरणच करुन टाकलं. मग गजबजलेला कॅंटीनचा कट्टा असो, आरडा ओरडा असणारे खेळाचे मैदान असो किंवा शांतता राखा, अशी सूचना असणारी कॉलेजची लायब्रेरी असो लैलाची एन्ट्री झाली की, मजनूच्या आरोळ्या आणि प्रेमाच्या चारोळ्या सुरु व्हायच्या. हे सर्व घडत असताना दोघांचे प्रेम नजरेच्या पुढे काही सरकताना दिसत नव्हतं.

Florida woman’s pet dog scares off alligator Nail-biting video is viral
“क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
a man cracking coconut with his head shocking video goes viral
धक्कादायक! डोक्यावर नारळ फोडले अन् पुढच्या क्षणी खाली पडला, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

याच कारण दोघांचे कॉलेज एक असले तरी शाखा वेगळी होती. पक्या आर्टस आणि लैला सायन्सच्या वर्गात शिकत होती. त्यामुळे प्रेमाचा गोल काही यशस्वी होताना दिसेना. मात्र कॉलेज कॅम्पसमध्ये दोघांच्या प्रेमाची चर्चा दिवसेंदिवस अधिक रंगू लागली. एकीकडे पक्याची मित्रमंडळी त्याला प्रपोज कर म्हणून मागे लागली होती. तर दुसरीकडे आपल्या मैत्रिणीला ‘फिर प्यार हो जाएगा’ असं तिच्या मैत्रिणीला वाटू लागलं होतं. रोजच्याप्रमाणे लैलाची कॉलेजमध्ये एन्ट्री झाली. पक्याने नजरेचा खेळ सुरु केला. यावेळी राकेश म्हणाला.  “पक्या, बस यार आज ४ वाजता कॉमन व्याख्यान आहे. त्यावेळी तिच्याशी थेट बोलून टाक, मला फुल खात्री आहे. ती तुला होकार नक्की देईल.” राकेश त्याच वाक्यपूर्ण करतो न करतो तोच रवीनेही पक्याला डिवचले.  “ये मजनू पुरे हं… नजरेचा खेळ खल्लास कर अन् बोलून टाक, नाहीतर हातची निघून जाईल पोरगी. मग बसशील इवळत ‘एक ऐसी लडकी थी जिसे मै प्यार करता था!’ आणि हो फिल्मी स्टाइल सल्ला समजू नको हा अनुभवाचे बोल आहेत. बस आपलं गाणं थोड वेगळं आहे एवढंच.”  हा सल्ला देऊन रवी ह्रदयावर हात ठेवून ‘सदा खुश रहो तुम दुवाँ है हमारी’ हे गाणं गुणगुणायला लागला. याचवेळी वर्गात जाण्यापूर्वी लैलाने मागे वळून पाहत पक्याला प्रतिक्षा असणारी स्माइल दिली. पक्यानं डोळे मिटून तिच्या स्माइलला ह्रदयात जपून ठेवल्याचं दाखवत प्रेम कहाणी सुरु झाल्याचे संकेत दिले.
दीड महिन्यांनंतर लैलाच्या चेहऱ्यावर पक्याबद्दल दिसलेलं स्मित हास्य पाहून तिची मैत्रीण मनिषा थोडी अस्वस्थ झाली. तिने लैलाला वर्गातून बाहेर आणलं. तिला घेऊन ती थेट कॅंटीनमध्ये पोहोचली. मनिषाने आतापर्यंत बंद ठेवलेला तोंडाचा पट्टा सुरु केला.

“अगं ए वेडे खरचं प्रेमात पडलीस का पक्याच्या? तुझं काय सुरु आहे, तुझ तुला तरी कळतंय ना बाई? आपला एक बॉयफ्रेंड आहे. यापूर्वी ब्रेकअप किती झालीत याचा हिशोब नाही. आता एकाच वेळी दोघांसोबत प्रेमाची उधळण करायला निघाली आहेस, नक्की तुझ्या प्रेमाची व्याख्या तरी काय? हे बघ ब्रेकअपनंतरचे प्रपोज मी समजू शकते. पण सर्व ठिक सुरु असताना हे तुझं वागण काही योग्य वाटत नाही. याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात. त्याला तू एंगेज आहेस ते सांगून टाक. तुला शक्य नसेल तर मी बोलते त्याच्याशी पण थांबव हे.”  लैलाने शांतपणे मनिषाचं बोलणं ऐकूऩ घेतलं. त्यानंतर ती म्हणाली, “आयुष्याच्या इतिहासाला उजाळा देऊन माझ्याबद्दल असणारी काळजी दाखवल्याबद्दल खरंच आभार. पण तू असं काही करणार नाहीस. मुळात मला वाटत नाही तू असं काही करावंस. मी त्यांना फसवते किंवा खेळवते असं तुला वाटतं असेल तर त्यावर मी नियंत्रण ठेवू शकत नाही. तसंच मला नक्की काय वाटतं यावरही तू नियंत्रण ठेवू शकत नाहीस. आता प्रश्न उरतो तो परिणामाचा तर त्यावेळीही तू माझ्यासोबत असशील, अशी आशा बाळगते.” मनिषाच्या अस्वस्थेची कोंडी फोडून पक्याच्या प्रेमात रंगण्यासाठी लैला अस्वस्थ झाली होती.

(पूर्वार्ध)
– तीन फुल्या, तीन बदाम