News Flash

मारहाणप्रकरणी १८ अटकेत

ठाणे परिवहन सभापतीपदावरून महापालिकेत तसेच नौपाडा पोलीस ठाण्याच्या आवारात धिंगाणा घालणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या १८ कार्यकर्त्यांना

| December 21, 2013 02:34 am

ठाणे परिवहन सभापतीपदावरून महापालिकेत तसेच नौपाडा पोलीस ठाण्याच्या आवारात धिंगाणा घालणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या १८ कार्यकर्त्यांना शुक्रवारी नौपाडा पोलिसांनी अटक केली असून या सर्वाची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
परिवहन समितीतील शिवसेना सदस्य शैलेश भगत यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने गळाला लावत त्यांचा परिवहन सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज दाखल करण्यावरून महापालिका परिसरात शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. तसेच नौपाडा पोलीस ठाण्याच्या परिसरातही या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आपला हिसका दाखवत त्यांना आवर घातला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 2:34 am

Web Title: 18 arrested in assault case
Next Stories
1 नाताळसाठी कोकण रेल्वेची जादा गाडी
2 पाच हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अटकेत
3 आर्थिक गाडा चालविण्यासाठी दर महिन्याला कर्जाची कसरत
Just Now!
X