१९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी झैबुनिसा काझी आणि शरीफ दादा पारकर यांनी सोमवारी मुंबईत विशेष टाडा न्यायालयात शरणागती पत्करली. पारकर यांना आजारपणामुळे स्ट्रेचरवरून न्यायालयात आणण्यात आले होते. कर्करुग्ण असलेली झैबुनिसाही व्हिल चेअरवरून न्यायालयात आली होती.
टाडा न्यायालयाने या दोघांना सुनावलेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कामय ठेवली. दोघांनाही १७ मे रोजी आत्मसमर्पण करायचे होते. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे दोघांनीही त्यादिवशी शरणागती पत्करली नाही. शरणागती पत्करल्यानंतर न्यायालयाने या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश पोलिसांना दिले.