News Flash

26/11 Stories of Strength : राजनाथ सिंह, गडकरी, अमिताभ बच्चन एक्स्प्रेसच्या कार्यक्रमात

या कार्यक्रमात स्टोरीज ऑफ स्ट्रेंथ म्हणजेच धाडसाच्या कहाण्या सांगितल्या जाणार आहेत.

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने इंडियन एक्स्प्रेस ग्रुपने स्टोरीज ऑफ स्ट्रेंथ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अमिताभ बच्चन, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमात स्टोरीज ऑफ स्ट्रेंथ म्हणजेच धाडसाच्या कहाण्या सांगितल्या जाणार आहेत. तसंच कार्यक्रमही सादर होणार आहेत. कविता कृष्णमुर्ती, महेश काळे, रेखा भारतद्वाज, शिल्पा राव हे कलाकारही सहभागी होणार आहेत. शामक दावर डान्स कंपनी, सिंफनी ऑर्केस्ट्रा, इंडियन नेव्ही बँड, महाराष्ट्र पोलीस पाईप बँडही या कार्यक्रमात सहभागी आहेत. विकी कौशल आणि राधिका आपटे हे या हल्ल्याशी सामना केलेल्यांची मुलाखत घेणार आहेत. तसेच जे लोक या हल्ल्यात मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधणार आहेत.

पाहा व्हिडीओ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 6:20 pm

Web Title: 2611 stories of strength rajnath gadkari and bachchan at express event scj 81
Next Stories
1 गर्विष्ठ भाजपाच्या शेवटाला आता सुरुवात झाली – नवाब मलिक
2 किमान समान कार्यक्रमाला सोनिया गांधींची संमती; महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर प्रकाशन
3 महाआघाडीचं तीनचाकी सरकार चालणं कठीण – फडणवीस
Just Now!
X