05 June 2020

News Flash

वोक्हार्ट रुग्णालयातील ५० कर्मचारी बाधित

वोक्हार्ट रुग्णालयात कस्तुरबा रुग्णालयातून २ संशयित आणि २ करोनाबाधिता रुग्ण दाखल झाले होते.

संग्रहित छायाचित्र

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयातील परिचारिकांसह ५० आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे सोमवारी निदर्शनास आले.  प्रतिबंधित विभाग म्हणून जाहीर केलेल्या या रुग्णालयाच्या चौकशीसाठी पालिकेने समिती नियुक्त केली आहे. मुंबईत साठहून अधिक रुग्ण जी दक्षिण विभागात आढळले असून त्या खालोखाल अधिक रुग्ण आता वोक्हार्ट  रुग्णालयात नोंदवले गेले आहेत. वोक्हार्ट रुग्णालयात कस्तुरबा रुग्णालयातून २ संशयित आणि २ करोनाबाधिता रुग्ण दाखल झाले होते. बाधित रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवले असले तरी रुग्णालयाने संशयित रुग्णांना मात्र इतर रुग्णांसोबत अतिदक्षता विभागात ठेवले. काही दिवसांतच या रुग्णांनाही करोनाची लागण झाल्याचे निदान झाले. परंतु तोपर्यंत अतिदक्षता विभागात काम करणारे अनेक कर्मचारी रुग्णांच्या संपर्कात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 12:48 am

Web Title: 50 employees of wockhardt hospital affected abn 97
Next Stories
1 मुंबईत एका दिवसात ५७ नवे रुग्ण
2 देशातील प्राणिसंग्रहालयांमध्ये अधिक दक्षता
3 बेरोजगारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी कृती दलाची गरज!
Just Now!
X