श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्ट परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ३२ संशयित बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत जिल्ह्य़ात ३५० संशयितांना पकडण्यात आले असून त्यांची शहानिशा करण्यासाठी रायगडचे विशेष बांगलादेशी पथक सोमवारी पश्चिम बंगालकडे रवाना होत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी परिसरात दिघी पोर्ट नावाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकारास येत आहे. या पोर्टच्या कामावर बांगलादेशी कामगार असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाली होती.
रायगडच्या विशेष बांगलादेशी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिघी सागरी पोलिसांच्या सहकार्याने पोर्टच्या परिसरात कोिम्बग ऑपरेशन केले. तेव्हा तेथे बांधलेल्या बराकींमध्ये ५२ बांगलादेशी मजूर आढळून आले. त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. पोलिसांनी या सर्वाना ताब्यात घेतले. हे सर्व जण नेमके कुठले रहिवासी आहेत याची शहानिशा सुरू आहे. मात्र या मजुरांना येथे घेऊन येणारा ठेकेदार हैदराबाद येथील असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आसाममध्ये स्थानिक आदिवासी व बांगलादेशी घुसखोर यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने बांगलादेशी घुसखोर शोधून काढण्याची मोहीम हाती घेतली. प्रत्येक जिल्ह्य़ात विशेष बांगलादेशी पथक स्थापन करण्यात आले. रायगडमधील या पथकाने आतापर्यंत ३५० संशयित बांगलादेशींना ताब्यात घेतले. त्यांपकी आठ जण बांगलादेशचे नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याविरुद्ध पारपत्र प्रवेश अधिनियम १९५० व विदेशी नागरिक कायदा १९४६ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. नेपाळींची चौकशी थांबवली
जिल्ह्य़ात चायनीजच्या गाडय़ांवर नेपाळी तरुण मोठय़ा संख्येने काम करतात. त्यामध्ये अनेक जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याबाबत आमदार भरत गोगावले यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून पोलिसांनी नेपाळींचीही चौकशी सुरू केली होती. मात्र ही चौकशी आता थांबविण्यात आल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांनी सांगितले.