नेत्रदानासाठी राज्यात जनजागृती करुन व्यापक मोहीम राबविली जात असताना योग्य वैद्यकीय माहिती अभावी आणि पायाभूत सुविधा नसल्याने दान झालेल्यापैकी केवळ ३७ टक्के नेत्रांमधूनच दृष्टीहीनांना संजीवनी किंवा दृष्टी मिळाली. उर्वरित ६३ टक्के डोळे (बुब्बुळे) प्रशिक्षण, संशोधन या कारणांसाठी वापरले जातात आणि वाया जातात, अशी कबुली आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी विधानपरिषदेत
दिली.
यासंदर्भात चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, भगवान साळुंके आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यभरात २०१२-१३ मध्ये ५५८७ डोळे (बुब्बुळे) नेत्रदानातून जमा झाले. पण त्यापैकी २०३३ नेत्रांचीच (३७ टक्के) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होवू शकली. १६२२ बुब्बुळे प्रशिक्षण व संशोधनासाठी वापरली गेली. तर १९३२ बुब्बुळांचा कोणताही उपयोग न झाल्याने ती नष्ट करण्यात आल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.