24 February 2021

News Flash

युक्ता मुखीच्या मोलकरणीस अटक

अभिनेत्री युक्ता मुखीच्या मोलकरणीला कांदिवली पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. सुनिता वालिक (३०) असे तिचे नाव असून कांदिवली येथील एका घरातून सहा लाखांची चोरी

| June 24, 2013 05:11 am

अभिनेत्री युक्ता मुखीच्या मोलकरणीला कांदिवली पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. सुनिता वालिक (३०) असे तिचे नाव असून कांदिवली येथील एका घरातून सहा लाखांची चोरी करून ती फरार झाली होती.
कांदिवली रेल्वे वसाहती राहणाऱ्या नग्मा यमन यांच्या घरी २१ एप्रिलपासून सुनिता कामाला होती. ४ मे रोजी घरात कुणी नसताना सुनिताने प्रियकर विनोदच्या मदतीने घरातील रक्कम व दागिने असा सहा लाखांचा ऐवज लुटून पळ काढला होता.
युक्ता हिच्या अंधेरी येथील घरी अवघ्या आठच दिवसांपूर्वी सुनिताने काम मिळवले होते. तेथेही ती हात साफ करण्याच्या प्रयत्नात होती.  पण कांदिवली पोलिसांनी तिला प्रियकरासह शनिवारी अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 5:11 am

Web Title: actors maid held for rs 6l theft at last employers flat
टॅग Crime News
Next Stories
1 एटीएममधून डेटा चोरणारे ‘बल्गेरियन’
2 सेनेसाठी मनसे अजून अस्पृश्य नाही!
3 प्रा. दिलीप नाचणे पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार मंडळावर
Just Now!
X