प्रेक्षकोंनाही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याची संधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणापासून अर्थकारणापर्यंत विविध विषयांवर ‘गुगल हॅंगआऊट’च्या माध्यमातून थेट प्रश्न विचारण्याची संधी आज ‘लोकसत्ता’च्या काही निवडक वाचकांना मिळणार आहे. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता दृष्टिकोन’ या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर हे मुख्यमंत्र्यांशी राज्यासमोरील विविध प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. सायंकाळी सहापासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण indianexpress-loksatta.go-vip.net वरून केले जाणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांनाही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी आपले प्रश्न ट्विटरवरून #LoksattaDrushtikon हा हॅशटॅग वापरून पाठवायचे आहेत. त्यातील निवडक प्रश्नांना देवेंद्र फडणवीस स्वत उत्तरे देतील. तेव्हा शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता लॉगईन करा :
indianexpress-loksatta.go-vip.net