28 October 2020

News Flash

पोलिसांवरील हल्ले सुरूच

२४ तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले आणि मारहाण झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलिसांवर गेल्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले आणि मारहाण झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी एका हल्ल्यात तीन जणांना अटक केली असून दुसऱ्या घटनेतील हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. सोमवारी रात्री प्रभादेवी परिसरात मद्यधुंद तीन तरुण एकमेकांशी मोठमोठय़ाने वाद घालत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रूपेश दरेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणांना जाब विचारला असता, तिघांनी दरेकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. गस्तीवर असलेल्या इतर पोलिसांनी या तीन तरुणांना लगेचच ताब्यात घेतले. विनोद उतेकर, लाभेश गावडे, अभिजित चव्हाण अशी या तीन तरुणांची नावे आहेत. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
दरम्यान, सहार येथे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गस्त घालणाऱ्या हरिश्चंद्र शिंदे (४६) यांच्यावर दगडाने हल्ला केला. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 12:02 am

Web Title: attacks continued on police
Next Stories
1 रवींद्र सावंत यांचा खुलासा
2 अक्षय कुमारकडून दुष्काळग्रस्तांना ५० लाखांची मदत
3 दिलीप कुमार यांचा ‘तो’ फोटो पाहून अमिताभ बच्चन आनंदित
Just Now!
X