News Flash

उल्हासनगरमध्ये बारबालेला भररस्त्यात जिवंत जाळले

महिलेवर उपचार सुरु

प्रतिकात्मक छायाचित्र

उल्हासनगरमध्ये बारबालेला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला सुमारे ६० टक्के भाजली असून तिच्यावर उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

उल्हासनगर- ३ मधील ब्ल्यू बेरी लॉज असून या लॉजच्या लिफ्टजवळ बारबालेवर सोमवारी संध्याकाळी एका व्यक्तीने हल्ला केला. हल्ला करणाऱ्या व्यक्तीने बारबालेला जिवंत जाळले. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या महिलेला उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित महिला या घटनेत सुमारे ६० टक्के भाजल्याचे समजते. महिलेवर हल्ला करणारा व्यक्ती तिचा पती असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस अधिक तपास करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 11:10 pm

Web Title: bar girl burnt alive in ulhasnagar by unknown person
Next Stories
1 ‘हुतात्मा चौका’चे नाव आता ‘हुतात्मा स्मारक चौक’
2 Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; मुलुंडजवळ लोकलमध्ये बिघाड
3 ‘ते’ तरुण दहा वर्षांपासून आयएसआयच्या संपर्कात
Just Now!
X