News Flash

चालकाला हार्ट अ‍ॅटॅक आल्याने मुंबईत बेस्टचा अपघात, प्रसंगावधान राखल्याने वाचले प्रवाशांचे प्राण

बस चालकावर उपचार सुरु आहेत, त्याची प्रकृती स्थिर

मुंबईत बेस्ट चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने बसवरचं नियंत्रण सुटून अपघात झाला. मात्र बस चालकाने प्रसंगावधान दाखत वेग कमी करुन बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बस फूटपाथवर असलेल्या एका भाजीच्या दुकानात घुसली आणि सिग्नलला धडकून थांबली. त्यामुळे या घटनेतले सगळे प्रवासी सुखरुप आहेत. तर बस चालकावरही उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. घाटकोपरहून टाटा पॉवर हाऊस, चेंबूरच्या दिशेने जाणाऱ्या बेस्टच्या ३८१ क्रमांच्या बसला हा अपघात झाला. चेंबूर पोलीस स्टेशनच्या समोर बसंत पार्क या ठिकाणी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हा अपघात झाला.

बससे चालक हरिदास पाटील यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले.सुदैवाने बस मध्ये असलेल्या दहा ते बारा प्रवासी सुखरूप आहेत.

बेस्ट बस चालवत असतानाच बस चालकाला हृदय विकाराचा झटका आला आणि त्याचं बसवरचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे चेंबूर या ठिकाणी हा अपघात घडला. अपघातामुळे बेस्टची ही बस फूटपाथवर असलेल्या भाजीच्या दुकानावर आदळली आणि सिग्नलला टक्कर देऊन थांबली. सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. बेस्ट चालकाने प्रसंगावधान दाखवून बेस्ट बस बाजूला घेतल्याने आणि वेग कमी केल्याने मोठी दुर्घटना टळली. या बेस्ट चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 2:01 pm

Web Title: best bus drirver suffers heart attack on duty bus accident in chembur scj 81
Next Stories
1 वायूगळतीचे गूढ
2 पैशाच्या वादातून तरुणाकडून पत्नीची हत्या
3 पहिल्या दिवशी कमी प्रतिसाद
Just Now!
X