यावर्षी बेस्ट परिवहन उपक्रमास आíथकस्थिती सुधारली असल्याने कर्मचाऱ्यांना दिवाळीत सानुग्रह अनुदान देण्याची मागणी बेस्ट कर्मचारी संघटनांनी केली आहे. या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सलग तीन दिवस संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा बेस्ट कामगार कर्मचारी कृती समितीने मंगळवारी दिला.

या संपाला बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार सेना, बेस्ट इलेक्ट्रिकल वर्कर्स, बेस्ट कामगार युनियन आणि एससी. एसटी एम्प्लॉईज युनियन या पाच महत्त्वाच्या युनियनचा पािठबा असणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून आíथक तोटय़ाचे कारण पुढे करत बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान नाकारण्यात येत होता. मात्र सुरू आíथक वर्षांत सुमारे ६५ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्यामुळे यापूर्वी बेस्टने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी समितीच्या नेत्यांनी केली आहे.

महापालिकेतील इतर परिवहन सेवेतील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळत असताना बेस्टच्या कर्माचाऱ्यांसोबत दुजाभाव का असा प्रश्न ही यावेळी समिती सदस्यांनी उपस्थित केला. या आंदोलनामुळे बेस्टची एकही बस रस्त्यावर धावणार नसल्याचे कृती समितीचे निमंत्रक के.एस. अहिरे यांनी सांगितले. याशिवाय कर्मचाऱ्यांना कॅनेडियन पद्धती वेळापत्रक प्रणालीसही विरोध असल्याचे समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले.