पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या काही महिन्यात १० रुपये प्रतिलिटरहून अधिक कमी झाल्याने प्रवासी आणि मालवाहतुकीचे दर कमी करण्याची मागणी भाजपने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे
. सत्ताधारी भाजपकडूनच ही मागणी झाल्याने आता रिक्षा आणि एसटीच्या भाडय़ात कपात होण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्र्यांनी त्यादृष्टीने अधिकाऱ्यांशी चर्चाही सुरु केल्याचे सूत्रांनी सांगितले.भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी परिवहन मंत्र्यांना पत्र लिहून प्रवासी दर कपातीची मागणी केली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर १०-२० पैशांनी वाढले की लगेच जनतेला वेठीला धरुन वाहतूकदारांकडून दरवाढ केली जाते. पण गेल्या ९ महिन्यांत पेट्रोल व डिझेलचे दर १६ वेळा उतरले.