‘प्रभाग’फेरी – ‘आर’ दक्षिण विभाग

अंतर्गत भाग :   पोईसर नदीच्या काठावरील अविकसित परिसर

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

‘आर’ दक्षिण विभागात असलेल्या पोईसर नदीच्या काठी कोणे एकेकाळी चित्रपटातील गाणे चित्रित झाले होते. डहाणूकर वाडीमधील पुलावरून जाताना खाली दिसणारी आताची नदी मात्र दयनीय आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहत येणारी ही नदी कांदिवली पश्चिमेकडून मालाडकडे जात खाडीला मिळते. या नदीच्या दोन्ही काठांवरच्या परिसराने ‘आर’ दक्षिण विभागाचा बहुतेक भाग व्यापला आहे. मात्र नदीचीच अवस्था एवढी बिकट आहे की परिसराचे बकालीकरण कसे रोखणारे? राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत डोंगरावर असलेली दामू नगर, गौतम नगर अशी वस्ती, शेजारचा वडारपाडा व हनुमान नगर अशा गरीब वस्त्यांसोबतच लोखंडवाला संकुल, ठाकूर संकुल, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनी कांदिवली पूर्वेला तर डहाणूकरवाडी, महावीरनगर येथील मध्यमवर्गीय तसेच उच्च मध्यमवर्गीय वस्ती व बंदरपाखाडीसारखी गरीब वस्ती कांदिवली पश्चिमेला आहे. पोइसरमधील चर्च व परिसरातील ख्रिश्चन वस्तीही या विभागात आहे. अठरापगड जाती, जमाती या वॉर्डमध्ये येतात आणि त्यामुळे या वॉर्डला एकच एक चेहरा नाही. मराठी, गुजराती, ख्रिश्चन यांची काही वस्ती काही भागांत एकवटली असली तरी नगरसेवकाला निवडून येण्यासाठी सर्वच जाती-धर्माच्या लोकांना सांभाळून घ्यावे लागते.

प्रभागांच्या समस्या

काँग्रेसचे बळ घटणार?

नव्या प्रभागरचनेत ‘आर’ दक्षिणमध्ये दोन जागा वाढल्या आहेत. या वाढीव जागांवर कोणता पक्ष हक्क सांगणार त्यावरून या वॉर्डमधील राजकीय समीकरणे बदलू शकतात. चारकोपमधील मराठी मतांवर सेना व डहाणूकरवाडी, महावीरनगरसारख्या उच्चभ्रू वस्तीच्या जागा भाजपकडेच राहतील, असा अंदाज आहे. गरीब वस्त्यांमधील जागांवर काँग्रेसची पकड मजबूत होती. त्यामुळेच पाच वर्षांपूर्वी ११ पैकी सहा जागांवर काँग्रेस निवडून आली होती. भाजपला तीन तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या होत्या. मात्र पाच वर्षांनंतर स्थिती बदलली आहे. काँग्रेसची गेल्या पाच वर्षांतील वाटचाल व नेत्यांमधील सुंदोपसुंदी यामुळे परंपरागत मतदार बिथरला असण्याची शक्यता आहे. गरीब वस्तीतील या जागा काँग्रेस स्वतकडे राखण्यात यशस्वी होते की सेना, भाजप मजल मारतात ते काँग्रेसच्या एकूण प्रवासासाठीही महत्त्वाचे ठरेल.

जंगलातील वस्ती

गेल्या वर्षी दामू नगर वस्तीला आग लागली होती. शे-दीडशे कुटुंबांच्या घराची होळी झाली होती. डोंगरउतारावर असलेल्या या वस्तीच्या जागेचा ताबा वन विभागाकडे आहे. या वस्तीच्या पुनर्विकासाचे काम गेली पाच वर्षे सुरू आहे. वस्ती बेकायदेशीर असल्याने दामू नगरमध्ये नागरी सोयीसुविधांची वानवा आहे. हीच स्थिती कमीअधिक फरकाने गौतम नगर, हनुमान नगर, वडारपाडा वस्तीची आहे.

आरोग्यसेवेचा बोजवारा

कांदिवली पूर्वेला बांधलेले शताब्दी रुग्णालय अवघ्या दहा-पंधरा वर्षांत मोडकळीला आल्यानंतर तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची भव्य वास्तू उभी करण्यात आली. मात्र अजूनही रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेले नाही. या रुग्णालयाशी संलग्नित वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने निवासी डॉक्टर तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता जाणवते. तरीही बोरीवलीत बंद पडलेले भगवती आणि अजूनही नीट सुरू न झालेले विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय अशा स्थितीत डॉ. आंबेडकर रुग्णालय हे बुडत्याला काडीचा आधार ठरते.

मोकळ्या जागांचा अभाव

दक्षिण मुंबईत मोकळ्या जागांची चंगळ आहे असे म्हणण्याइतपत उपनगरांमध्ये मैदान, बागांचा अभाव आहे. ‘आर’ दक्षिणेतही काही बागांचा अपवाद वगळता परिस्थिती वाईट आहे. जी मैदाने शिल्लक होती तिथे पालकत्व देण्याच्या नावाखाली बांधकाम करण्यात आले. पोईसरसारख्या मैदानात तर चालण्याच्या ट्रॅकखेरीज सामान्यांना मैदान बंद करण्यात आले. व्यायामशाळा, गणेशोत्सवाचे व्यासपीठ नावाखाली अनेक मैदानांचा अर्धाअधिक भाग व्यापण्यात आला. काही ठिकाणी बागा करण्यात आल्या व पुरेशा व्यवस्थापनाऐवजी त्यांची काही महिन्यांत रया गेली.

पार्किंगचा पेच

८० च्या दशकात वसवल्या गेलेल्या चारकोपसारख्या विभागात इतर नागरी सुविधा असल्या तरी गाडय़ा ठेवण्यासाठी मात्र जागा नाही. बैठय़ा गृहसंकुलांना जोडणारे रस्ते अगदीच अरुंद व त्याकडे दोन्ही बाजूंनी वाहने उभी केली जातात. गृहनिर्माण संकुलांमध्ये दुचाकी व सायकल लावण्यास परवानगी असली तरी चारचाकींना मात्र रस्त्यावरच ठेवावे लागते. गेल्या दोन दशकांत आलेल्या आर्थिक सुबत्तेचा विचार आधी करता न आल्याने ही समस्या उद्भवली आहे.

अरुंद रस्ते

कांदिवली पूर्वेला रेल्वे स्थानकाकडून पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा व त्यानंतर पुढे लोखंडवाला संकुलापर्यंत जाणारा रस्ता अरुंद आहे. ठाकूर व्हिलेज, ठाकूर संकुलातून पश्चिम द्रुतगती मार्गाने खाली उतरणाऱ्या वाहनांना स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी कितीही वेळ थांबावे लागू शकते. साधारणत जोगेश्वरी ते कांदिवलीदरम्यान पूर्वेकडच्या भागात सर्वच रस्त्यांची रुंदी कमी आहे. त्यामुळे वाहनांची संख्या मर्यादित असली तरी वाहतूककोंडी होते. गणेशनगरच्या चौकात तसेच लिंक रोडच्या सिग्नलकडे वाहतूककोंडी होते. मात्र त्याचे प्रमाण दक्षिणेतील उपनगरांप्रमाणे नसते. त्यामानाने पश्चिम द्रुतगती मार्गावर आधी उड्डाणपुलाचे काम सुरू राहिल्याने आणि आता जोगेश्वरीदरम्यान मेट्रोचे काम सुरू झाल्याने वाहतूककोंडी होते.

सध्याचे नगरसेवक

* प्रभाग १८ – श्रीकांत कवठणकर, शिवसेना</p>

*  प्रभाग १९- नेहा पाटील, काँग्रेस

* प्रभाग २० – शैलजा गीरकर, भाजप,

* प्रभाग २१ – रामअशीष गुप्ता, काँग्रेस

* प्रभाग २२- सुनीता यादव, भाजप

* प्रभाग २३ – प्राजक्ता सावंत, शिवसेना

* प्रभाग २४-  योगेश भोईर, काँग्रेस’

* प्रभाग २५ – डॉ. अजंता यादव, काँग्रेस

* प्रभाग २६- सागर ठाकूर, काँग्रेस

* प्रभाग २७- मुकेश मिस्त्री,

भाजप

* प्रभाग २८- डॉ. गीता यादव, काँग्रेस

फेररचनेनंतरची प्रभाग रचना

*  प्रभाग १९ (महिला सर्वसाधारण)

लोकसंख्या – ५३,६६८

चारकोप गाव, चारकोप औद्योगिक वसाहत, चारकोप १, बंदरपाखाडी

*  प्रभाग २० (खुला )

लोकसंख्या – ५८,२८६

सह्य़ाद्री नगर, गणेश नगर, बंदरपाखाडी

*  प्रभाग २१ महिला मागासवर्ग

लोकसंख्या – ५६,८५१

महावीरनगर, डहाणूकर वाडी, श्रावणनगर

*  प्रभाग २२ महिला मागासवर्ग

लोकसंख्या – ५७,६४३

पारेख नगर, सुंदरपाडा, कांदिवली गावठाण, पोइसर जिमखाना

*  प्रभाग २३ खुला

लोकसंख्या – ४८,६९१

रॅन इंटरनॅशनल स्कूल, सेंट लॉरेन्स हायस्कूल, गावदेवी, जनता नगर, पोईसर पूर्व

*  प्रभाग २४ महिला सर्वसाधारण

लोकसंख्या – ५१,०१४

डिफेन्स कॉलनी, आकुर्ली औद्योगिक वसाहत, कांदिवली रेल्वे यार्ड, ठाकूर संकुल

*  प्रभाग २५ महिला सर्वसाधारण

लोकसंख्या – ४७,३०६

ठाकूर महाविद्यालय, जानुपाडा, ठाकूर व्हिलेज

*  प्रभाग २६ महिला अनुसूचित जाती

लोकसंख्या – ४७,३१२

सिंग इस्टेट, लक्ष्मी नगर, गौतम नगर, दामू नगर

*  प्रभाग २७ महिला मागासवर्ग

लोकसंख्या – ४७,९७८

महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा इंडस्ट्री, नरसीपाडा, लोखंडवाला टाउनशिप, म्हाडा कॉलनी

*  प्रभाग २८ मागासवर्ग

लोकसंख्या – ५१,८३५

हनुमान नगर, वडार पाडा

*  प्रभाग २९ खुला

लोकसंख्या – ४८,५११

अशोक नगर, आकुर्ली नगर, भारतीय क्रीडा प्राधिकरण

*  प्रभाग ३० महिला सर्वसाधारण

लोकसंख्या – ५५,९२६

भाद्रण नगर, शंकर वाडी, इराणीवाडी

*  प्रभाग ३१ महिला मागासवर्ग

लोकसंख्या – ५६,६१२

एकता नगर, नीळकंठ नगर

डहाणूकर वाडीतील अरुंद रस्त्यांवर पदपथ बनवले आहेत. मात्र पाìकग केले जात असल्याने गाडय़ा जाण्यासाठी रस्ताच नाही. मुळात एवढय़ा लहान रस्त्यांवर पदपथ बनवू नयेत, म्हणून गेले सहा महिने स्थानिक लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाकडे फेरया सुरू आहेत. मात्र काहीही होऊ शकलेले नाही. 

– प्रभाकर बेलोसे, एएलएम, डहाणूकर वाडी

 गेल्या काही वर्षांत पुनर्वकिासामुळे इमारतींची उंची, घरांची संख्या वाढली. मात्र पाण्याचे प्रमाण तेवढेच आहे. रस्ते अरुंद आहेत. पुनर्वकिासासोबत रस्ते, पाणी यासारख्या पायाभूत सुविधांचा विचार पालिकेने केलेला नाही.

– आशुतोष शिर्के