ऑनलाइन औषध विक्रीच्या निषेधार्थ देशभरात पुकारलेल्या संपात महाराष्ट्रातील ८० हजार औषध विक्रेते सहभागी झाले होते, असा दावा केला जात आहे. दीड हजार औषध विक्रेत्यांनी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले होते.
औषध विक्रेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपले गाऱ्हाणे मांडले. आपण याबाबत केंद्र सरकारकडे बाजू मांडू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

दरम्यान, सरकारी तसेच काही खासगी रुग्णालयातील औषधांची दुकाने सुरू असल्यामुळे रुग्णांना फटका बसला नाही, असा दावा अन्न आणि औषध प्रशासनाने केला आहे.  संकेतस्थळावर सुरू असलेल्या औषध विक्रेत्यांची यादी दिल्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली नाही. गरजेनुसार औषधे मिळाल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने सांगितले जात आहे.