News Flash

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे सचिवांना आदेश

राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्याच्या काही भागात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असून बाधित क्षेत्रात तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून राज्यात आलेल्या प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत शासनाने तत्काळ मदत केली आहे. सध्या बऱ्याच भागांत विविध पिकांच्या काढण्या सुरू आहेत. मात्र, राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानीचे पंचनामे त्वरित करणे गरजेचे असून तसे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दिले आहेत, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 9:52 pm

Web Title: cm orders secretary to help farmers affected by rain aau 85
Next Stories
1 सत्यजित तांबे यांचा आदित्य ठाकरेंना राजकीय सल्ला, म्हणाले ‘हीच ती वेळ’
2 अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांचा शिवसेनेला पाठींबा
3 अपक्षांच्या पाठिंब्याने सेनेचे संख्याबळ ६०वर
Just Now!
X