News Flash

अनिल देशमुख, राज्य सरकारच्या याचिकेवर आज निकाल 

गुन्ह्यातील काही भाग वगळण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय गुरुवारी निर्णय देणार आहे. 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (संग्रहीत छायाचित्र)

मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, तर या गुन्ह्यातील काही भाग वगळण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय गुरुवारी निर्णय देणार आहे.  न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने देशमुख आणि राज्य सरकारच्या याचिकेवर युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यावरील निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाने सुनावणीच्या वेळी देशमुखांवरील आरोपांशी संबंधित सगळ्यांची चौकशी सीबीआयने करायला हवी, असे मत नोंदवले होते. देशमुखांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी या प्रकरणी तक्रार का दाखल केली नाही, तसे करण्यापासून त्यांना कोणी रोखले होते, असा प्रश्न उपस्थित करून परमबीर यांच्या भूमिके वरही बोट ठेवले हेते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 12:53 am

Web Title: crimes filed on corruption charges home minister anil deshmukh akp 94
Next Stories
1 लोकल प्रवासाअभावी मुंबईकरांचे हाल
2 खासगी शाळांच्या शुल्काचे अधिकार सरकारकडे?
3 मृत्यूचे हॉटस्पॉट! मुंबईत भूस्खलनाचा धोका असलेली २९१ ठिकाणं; सर्वाधिक जागा एस वॉर्डात
Just Now!
X