08 December 2019

News Flash

आयआयटीच्या तंत्र महोत्सवाचे डिजिटायझेशन

विविध समस्यांना डिजिटायझेशनने उत्तर देण्यासाठी विशेष स्पर्धेचे आयोजन

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

विविध समस्यांना डिजिटायझेशनने उत्तर देण्यासाठी विशेष स्पर्धेचे आयोजन

आशिया खंडातील सर्वात मोठा तंत्रमहोत्सव म्हणून ओळख असलेल्या आयआयटी मुंबईच्या तंत्रमहोत्सवात यंदा डिजिटायझेशन करण्यात आले आहे. यामुळे नियोजनात विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून, त्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरणही होऊ शकेल.

दरवर्षी नवी संकल्पना घेऊन येणाऱ्या आयआयटीच्या तंत्रमहोत्सवात यावर्षी डिजिटायझेशन आणि जैवतंत्रज्ञान या दोन संकल्पना आहेत. यावर्षी प्रथमच समाजातील विविध समस्यांना डिजिटायझेशनने उत्तर देण्यासाठी विशेष स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व करत असताना आयोजकांनीही डिजिटायझेशन करण्याचे ठरविले आणि यावर्षी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यापासून त्यांच्या आदरातिथ्याची सुविधा आदींचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. या सर्व प्रक्रियेसाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. दरवर्षी आयआयटीच्या तंत्रमहोत्सवाला येणाऱ्या सुमारे चार ते पाच हजार स्पर्धकांची राहण्याची सोय करावी लागते. ही सोय करत असताना आदरातिथ्य समूहाकडे खूप गर्दी होत असे आणि या कामासाठी खूप वेळ जात असे. यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी यावर्षीच्या तंत्रमहोत्सवाच्या आयोजन समितीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळेस या सेवेचे डिजिटायझेशन करता येईल असा विचार समोर आला आणि त्यावर काम सुरू झाले. यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून स्पर्धकांनी ऑनलाइन नोंदणी करून रक्कम जमा केली की त्यांना एक तिकिट ओळख क्रमांक दिला जाईल. त्याचबरोबर चार दिवस आधी एक क्यूआर कोड दिला जाईल या क्यूआर कोडच्या आधारे तो विद्यार्थी त्याच्या रूममध्ये राहू शकतो तसेच तेथील सुविधांचा फायदा घेऊ शकतो असे सौरव गर्ग या आदरातिथ्य विभागाच्या प्रमुख विद्यार्थ्यांने सांगितले. या क्यूआर कोडच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचा सर्व तपशील नोंदविला जाईल व तो बारकोडशी जोडलेला असेल. स्पर्धकाने क्यूआरकोडची प्रिंट आऊट स्वत:जवळ बाळगून ते स्कॅन करून तो संकुलातील त्याच्या खोलीचे डिजिटल कुलूपही उघडू शकतो. महोत्सव संपल्यावर विद्यार्थी जात असताना बारकोडच्या माध्यमातून त्याच्या खर्चाचा सर्व तपशील त्याला दिला जाईल व उरलेली रक्कम त्याच्या खात्यात महोत्सव संपल्यावर २० दिवसांच्या आता पाठविली जाईल असेही सौरवने सांगिलते. या नवकल्पनेमुळे यावर्षी आयोजकांचा वेळ आणि मनुष्यबळ वाचणार असल्याचेही तो म्हणाला. तसेच ही संकल्पना भविष्यात इतरत्र वापरली जाऊ शकते अशी शक्यत्याही त्याने व्यक्त केली.

First Published on November 27, 2017 12:34 am

Web Title: digitization in iit techno festival
Just Now!
X