News Flash

क्रिकेटच्या वादातून तरुणाची हत्या

क्रिकेटच्या वादातून झालेल्या भांडणातून कुर्ला येथे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. मोहम्मद सैफ शफिक शेख (१९) असे या तरुणाचे नाव असून विनोबा भावे पोलीस

| April 12, 2013 03:29 am

क्रिकेटच्या वादातून झालेल्या भांडणातून कुर्ला येथे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. मोहम्मद सैफ शफिक शेख (१९) असे या तरुणाचे नाव असून विनोबा भावे पोलीस त्याच्या फरार मित्रांचा शोध घेत आहेत. कुर्ला पाइप लाइन येथे राहणारा मोहम्मद सैफ शफिक शेख (१९) हा तरूण आपल्या घराजवळील मैदानात सोमवारी क्रिकेट खेळत होता. त्यावेळी काही मुलांशी त्याचे भांडण झाले. त्या भांडणातून नईम आणि हमाद या दोघांनी त्याला बॅटने मारहाण केली. त्यात मोहम्मद गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मोहम्मद साबू सिद्दीकी महाविद्यालयात शिकत होता. आरोपी आणि मोहम्मद यांचे पूर्ववैमनस्य असावे. त्यातून ही घटना घडल्याची शक्यता पोलीस उपायुक्त धनजंय कुलकर्णी यांनी वर्तविली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 3:29 am

Web Title: dispute over cricket claims youths life
Next Stories
1 लाचखोरी करणारे मुंबईतील ३६ पोलिस निलंबित
2 सवलतींच्या साखरगाठी.. तरीही विक्रीची गुढी उतरती!
3 सवलतीच्या औषधांची पालिका रुग्णालयांतील दुकानांना सक्ती
Just Now!
X