News Flash

‘डॉ. आंबेडकर चरित्र साधने समिती’बाबत नाराजी

समितीत एकूण २३ जणांचा सहभाग असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत अध्यक्षपदी आहेत.

समितीत केवळ एक च महिला; सचिवांच्या नियुक्तीबाबतही आक्षेप

मुंबई : नव्याने पुनर्रचना झालेली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती’ सध्या वादात अडकली आहे. समितीच्या सदस्य सचिव पदी नियुक्त झालेल्या व्यक्तीचा आंबेडकरी चळवळीशी काही संबंध नाही, तसेच समितीत के वळ एका महिलेला स्थान मिळाले आहे, असे आक्षेप घेणारी पत्रे मुख्यमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना पाठवण्यात आली आहेत.

समितीत एकूण २३ जणांचा सहभाग असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत अध्यक्षपदी आहेत. या समितीच्या सदस्य सचिव पदी नियुक्ती झालेल्या साहित्यिकांच्या  योगदानाबाबत समितीतील कोणाही सदस्याला काहीच माहिती नसल्याचे लेखक ज. वि. पवार यांनी सामंत यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच गेली ५५ वर्षे समाज परिवर्तनाच्या चळवळीत कार्यरत असल्याने या समितीचे सचिव पद आपल्याला मिळावे, अशी मागणीही पवार यांनी के ली आहे. समितीत के वळ डॉ. प्रज्ञा पवार या एकाच महिलेचा समावेश असल्याबाबतही स्त्रीवादी लेखिका आणि इतर साहित्यिकांमध्ये नाराजी आहे. ‘आज अनेक अडचणींवर मात करत स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. अनेक  अभ्यासू स्त्रियाही समाजात आहेत. अशावेळी के वळ एका स्त्रिला समितीत स्थान देणे हे स्त्रियांवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. ही पुरूषी मानसिकता संपायला हवी’, अशी भावना लेखिका ऊर्मिला पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त के ली.

पत्र लिहिणारे साहित्यिक

ज. वि. पवार, उर्मिला पवार, डॉ. आशालता कांबळे, डॉ. प्रतिभा अहिरे, डॉ. छाया दातार, हिरा बनसोड, गिताली, छाया खोब्रागडे, प्रतिमा जोशी, डॉ. माया पंडित, सुबोध मोरे, डॉ. उमेश बगाडे, कुमुद पावडे,डॉ. वंदना सोनाळकर,  सुभाष थोरात, सुजाता गोठोस्कर, उषा अंभोरे, किरण मोघे, डॉ. दिपक बोरगावे, लता. प्र. म, कुमार शिराळकर, डॉ. अनिल सपकाळ, प्रा. सुनील अवचार, संध्या नरे पवार, डॉ. वंदना महाजन, दत्ता देसाई, केशव वाघमारे, प्राची हातिवलेकर, डॉ. महेबूब सय्यद, छाया कोरेगावकर, आनंद विंगकर, संजीव साने, डॉ. श्रीधर पवार, निशा शेंडे, डॉ. मिलिंद आवाड, संजय भिसे, डॉ. निळकंठ शेरे, अविनाश गायकवाड, सचिन बगाडे, शीतल साठे, जयंत उथळे, श्रीधर चैतन्य, अक्षय शिंपी, डॉ. आदिनाथ इंगोले, दयानंद कनकदांडे, सुरेश सावंत, सचिन माळी, विनया मालती हरी, अमरनाथ सिंग, शोभा बागुल, रमण मिश्र, डॉ. मयुरी सामंत, राजानंद सुरडकर, सुदाम राठोड, शैलेंद्र कांबळे, मोहिनी कारंडे, किशोर मांदळे, नितिन साळुंखे, अनिल जायभिये, सुरेश राघव, मुख्तार खान, रंगा अढांगळे, प्रा. वर्षां अय्यर, अविनाश जगताप, जयवंत हिरे, साहिल शेख, भगवान अवघडे, जितेंद्र लोणकर, अनिल भालेराव, युवराज बावा, अर्जुन जगधने, नरेंद्र लांजेवार, किशोर कर्डक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 1:28 am

Web Title: dissatisfied with dr ambedkar charitra sadhane samiti akp 94
Next Stories
1 गरजेएवढय़ाच कामगारांना कामावर बोलवा
2 ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन
3 शिक्षण हक्क कायद्यानुसार राखीव जागांसाठी दुपटीपेक्षा अधिक अर्ज
Just Now!
X