जसलोक रुग्णालयाच्या वस्तिगृहात राहणाऱ्या २६ वर्षीय निवासी डॉक्टर दिव्या मच्छिमारू शुक्रवारी सकाळी मृतावस्थेत आढळली. भूल देण्याचे औषध घेऊन तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गावदेवी पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
 डॉ.दिव्या मच्छिमारू (२६) ही मूळ हैद्राबादची होती. जसलोक रुग्णालयाची पदव्युत्तर विद्यार्थीनी होती तसेच भूलतज्ञ म्हणून काम करत होती. रुग्णालयाच्या वस्तीगृहातच ती रहात होती. शुक्रवारी सकाळी सहा तिची सहकारी उठवायला गेल्यावर ती प्रतिसाद देत नव्हती .शवविच्छेदन अहवालानंतर तिने नेमके कारण स्पष्ट होईल, असे परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त निसार तांबोळी यांनी सांगितले