भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर टिप्पणी केली आहे. शिवसेनेला काश्मिर मध्ये पुन्हा ३७० कलम हवे आहे का? सत्तेसाठी सिद्धांताशी किती समजोता करणार? असा सवाल त्यांनी केला आहे.

”शिवसेना नेता संजय राऊत यांनी गेट वे ऑफ इंडिया येथील भारत विरोधी “काश्मिर को चाहिये आझादी” निदर्शनाचे समर्थन केले आहे. शिवसेनेला काश्मिर मध्ये पुन्हा 370 कलम हवे आहे का? सत्तेसाठी सिद्धांताशी किती समजोता करणार!!?” असा सवाल सोमय्या यांनी शिवसेनेला ट्विटद्वारे केला आहे.

जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करताना संजय राऊत यांनी रात्रीच्या अंधारात चोर, दहशतवादी आणि दरोडेखोर जातात अशा शब्दांत टीका केली आहे.

आणखी वाचा – काश्मीर भारतापासून स्वतंत्र करण्याची भाषा सहन केली जाणार नाही – संजय राऊत

शिवाय, दिल्लीमधील जेएनयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचारानंतर मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर करण्यात आलेल्या आंदोलनात स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारे पोस्टर झळकावण्यात आले. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे पोस्टर काश्मीरला काही बंधनांमधून मुक्त करा, या मागणीसाठी होते असा दावा केला आहे.