राज्यातील ठराविक तंत्रशिक्षण संस्थांमध्ये रिक्त जागांची संख्या गेल्या पाच वर्षांत लक्षणीय वाढू लागली आहे. राज्यात २००९-१० साली २७१ अभियांत्रिकी महाविद्यालये होती. त्यावेळी रिक्त जागांचे प्रमाण केवळ ०.७९ (६९४जागा) इतके होते. त्यापुढील वर्षी मात्र रिक्त जागांचे प्रमाण वाढत गेले.

सढळपणे नव्या महाविद्यालयांना व वाढीव जागांना परवानगी देण्याच्या धोरणामुळे जागांची संख्या वाढत गेली. त्या प्रमाणात विद्यार्थी संख्या वाढली नाही.

आयटी, टेक्सटाईल, पेपर टेक्नॉलॉजी अशा अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. तसेच, मागणी नसतानाही

दुसऱ्या सत्रात वर्ग चालविण्याचे धोरण आणि महाविद्यालयांचा निकृष्ट दर्जा यामुळेही महाविद्यालयांतील जागा रिक्त राहत आहेत.

परिणामी रिक्त जागांचा आकडेवारी फुगत गेल्याचे दिसून येते. (पाहा चौकट-२) परंतु, यंदा नव्या जागांची भर पडलेली नसतानाही रिक्त जागांची संख्या वाढली आहे, हे विशेष.

 

जागा रिक्त राहण्याची काही कारणे

’ प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची संख्या वाढत नसतानाही सढळपणे जागा वाढविण्याचे धोरण

’ मागणी नसतानाही दुसऱ्या (सायंकाळ) सत्रात वर्ग चालविण्याचे धोरण

’ आयटी, टेक्स्टाईल, पेपर टेक्नॉलॉजी अशा अभ्यासक्रमांकडे कमी झालेला विद्यार्थ्यांचा ओढा

’ शहरातील महाविद्यालयांना जागा वाढवून मिळाल्याने दुर्गम भागातील महाविद्यालयांकडे विद्यार्थी फिरकेनासे होतात

’ महाविद्यालयांचा निकृष्ट दर्जा

’मागणी नसतानाही जागा रद्द करून घेण्यास संस्थाचालक अनुस्तुक