News Flash

करिअरविषयक प्रश्नांना तज्ज्ञांची उत्तरे

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळा १४, १५ जून रोजी मुंबईत

(संग्रहित छायाचित्र)

दहावी-बारावीनंतर उत्तम करियरसाठी अभ्यासक्रमांच्या वेगवेगळ्या पर्यायांबाबत अनेक प्रश्नांची दाटी विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या डोक्यात असते. याचीच योग्य उत्तरे मिळवून देण्यासाठी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा घेतली जाते. प्रचंड प्रतिसादात ठाण्यामध्ये नुकतीच ही कार्यशाळा झाली. आता पुन्हा एकदा दादरमध्ये ही कार्यशाळा होत आहे. १४ आणि १५ जून रोजी रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे ही कार्यशाळा होणार आहे.

या कार्यशाळेत विविध विषयांतील तज्ज्ञ, करिअर समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे ‘करिअर निवडीतील ताण’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. तर वैद्यकीय क्षेत्रातील करिअरविषयी डॉ. अमोल अन्नदाते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. विधि शिक्षणाविषयी प्रा. नारायण राजाध्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. कथा-पटकथा-संवादलेखनातील करिअरविषयी बोलतील शिरीष लाटकर, टीव्ही पत्रकारितेच्या जगातील प्रवासाबद्दल बोलतील, एबीपी माझाच्या पत्रकार ज्ञानदा कदम. तर समाजमाध्यमांवर करिअर घडवण्याचा मंत्र देतील, भारतीय डिजिटल पार्टी अर्थात भाडिपाचे सारंग साठय़े आणि डिजिटल मीडिया कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, ब्लॉगर प्रिया आडिवरेकर. याचसोबत करिअर समुपदेशक विवेक वेलणकर ‘करिअर निवडीच्या टप्प्यावर’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या सर्व तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल. सोबतच आपल्या मनातील प्रश्न आणि शंकांचे समाधानही या तज्ज्ञांशी थेट संवाद साधून करता येईल.

लक्षात ठेवा

* या कार्यशाळेसाठी प्रत्येकी ५० रुपये शुल्क भरून नोंदणी करावी लागेल. त्यासाठी खालील ठिकाणी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ७.०० या वेळात प्रवेशिका मिळू शकतील.

– रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी

– महाराष्ट्र वॉच अ‍ॅण्ड ग्रामोफोन कंपनी, शॉप नं. २ नक्षत्र मॉल, रानडे रोड, दादर (प.)

* त्याचबरोबर पुढील लिंकवरूनही विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

कधी?

१४ व १५ जून

कुठे?

रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी

प्रायोजक

* प्रेझेंटिंग पार्टनर- आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स

* सहप्रायोजक – विद्यालंकार क्लासेस  ल्ल  पॉवर्ड बाय पार्टनर्स – एनएमआयएमएस स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, सासमिरा, ए के एज्युकेशनल कन्सल्टंट, सिम्बॉयसिस स्किल्स अ‍ॅण्ड ओपन युनिव्हर्सिटी, एज्युकेशन ओव्हरसीज,  आयएनआयएफडी

*  बँकिंग पार्टनर – स्टेट बँक ऑफ इंडिया

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 1:37 am

Web Title: expert answers to career questions
Next Stories
1 ७० हजार गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला गती!
2 धान्य उत्पादनात ६३, तेलबियांत ७० टक्के घट
3 जिजामाता उद्यानातील पेंग्विनच्या आकर्षणाला ओहोटी
Just Now!
X