News Flash

छातीत दुखू लागल्याने दिग्दर्शक राजकुमार संतोषी रुग्णालयात दाखल

नानावटी रुग्णालयात उपचार सुरु

दिग्दर्शक राजकुमार संतोषी

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना छातीत दुखू लागल्याने मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील सुत्रांनी याला दुजोरा दिला आहे. हृदयरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सुत्रांकडून कळते.


निर्माते अशोक पंडीत यांनी देखील राजकुमार संतोषी यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असले तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नानावटी रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विवेक मेहन हे त्यांच्यावर उपचार करीत आहेत.

राजकुमार संतोषी सध्या अभिनेता रणदीप हुडा याला घेऊन एका सिनेमावर काम करीत आहेत. संतोषी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तीमत्व असून त्यांनी अनेक दर्जेदार सिनेमे दिले आहेत. यामध्ये घायल, दामिनी, अंदाज अपना अपना, घातक, पुकार, दि लिजेंड ऑफ भगतसिंग यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 10:31 pm

Web Title: film director rajkumar santoshi admitted to nanavati hospital following some cardiac related issues
Next Stories
1 जवानांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे
2 मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट
3 ‘हमको किनारा मिल गया है जिंदगी…!’
Just Now!
X