News Flash

अंधेरीत स्टुडिओला आग

अंधेरी परिसरातील वीरा देसाई मार्गावरील फाऊंड आयडिया स्टुडिओला शनिवारी सकाळी आग लागली. हा स्टुडिओ एका व्यावसायिक इमारतीमध्ये आहे.

| May 17, 2015 03:37 am

अंधेरी परिसरातील वीरा देसाई मार्गावरील फाऊंड आयडिया स्टुडिओला शनिवारी सकाळी आग लागली. हा स्टुडिओ एका व्यावसायिक इमारतीमध्ये आहे. आगीत कोणतीही जीवितहानी तसेच कोणी जखमी झाले नाही.
शनिवारी सकाळी या इमारतीमध्ये कर्मचारी कामाला आले त्यावेळेस त्यांना या ठिकाणी आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली.
अग्निशमन दलाने एक नंबरचा कॉल दिला आणि घटनास्थळी चार अग्निशमन बंब, दोन पाण्याचे टँकर आणि दोन रुग्णवाहिन्या दाखल झाल्या. ही आग काही वेळातच आटोक्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
या जागेवर जुने सामान साठवून ठेवण्यात आले होते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत जीवितहानी झाली नसल्याचेही विभागने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 3:37 am

Web Title: fire at andheri studio
Next Stories
1 मुख्य न्यायाधीश मोहित शाह यांना मातृशोक
2 अंधेरीच्या लोखंडवाला परिसरातील इमारतीला आग
3 राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी अजित पवारांची चौकशी होणार!
Just Now!
X