मुंबईमध्ये गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना कांदिवली चारकोप परिसरातील हिरानंदानी इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे.  या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या आणि चार पाण्याचे टॅंकर घटना स्थळी दाखल झाले आहेत. तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. या भीषण दुर्घटनेत जीवित हानीचे कोणतेही वृत्त नाही. इमारतीमध्ये काही रहिवाशांना अग्नीशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे. अजूनही या इमारतीमध्ये काही लोक अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  कांदिवली परिसरातील  ही  इमारत ३२ मजली असून १२ च्या सुमारास सर्वप्रथम इमारतीच्या ३२ व्या मजल्याला आग लागली. त्यानंतर आगीत ३१ व्या  मजल्यानेही पेट घेतली.  ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचे स्पष्ट झालेले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाला यश आले होते. सुदैवाने या अपघातात कोणत्यागी जीवित हानीचे वृत्त नाही. मात्र दोन इमारतीमधील दोन मजल्याला लागलेल्या आगीमध्ये  मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.