ताळेबंदीमध्ये मिम्सचा पाऊस; नेटकऱ्यांच्या कलात्मकतेला उधाण

मुंबई  : ‘गॅसच्या मोठय़ा बर्नरला १०८ छिद्रे आणि छोटय़ा बर्नरला ९७ छिद्रे’, ‘टूथब्रशला १२६० के स आणि कपडे धुण्याच्या ब्रशला १६३६ के स’.. ताळेबंदीच्या काळात सक्तीने घरात बसायला लागल्यामुळे नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीला अक्षरश: असे उधाण आले आहे. सध्या वेळचवेळ असल्यामुळे तो कसा जात नाही हे दाखवण्यासाठी सुरू असलेल्या छोटय़ा छोटय़ा मिम्सला प्रचंड लाइक्स मिळत आहेत.

करोनासारख्या जागतिक संकटाशी मुकाबला करण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वाना घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढचे २१ दिवस घरात बसायला लागणार असल्यामुळे साहजिकच समाजमाध्यमांवर त्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या आजाराचे गांभीर्य सांगणाऱ्या अनेक पोस्ट फिरत असल्या तरी या परिस्थितीतही लोकांची करमणूक होईल, अशा पोस्टचाही धुमाकू ळ सुरू आहे.

या मिम्सबरोबरच काही बोलकी छायाचित्रेही समाजमाध्यमांवर फिरत आहेत. उद्योगपती मुके श अंबानी व त्यांचे निवासस्थान असा फोटो आणि त्याच्या खाली लिहिलेय, ‘आज पुरा घर पहिली बार देख लिया!’

काही भन्नाट मीम्स

  •  चहाच्या गाळणीला एकू ण ३६५ छिद्र असतात, तीच आज साफ के ली
  •  ‘टूथब्रशला १२६० के स आणि कपडे धुण्याच्या ब्रशला १६३६ के स आणि हेअर डाय करण्याच्या ब्रशला किती के स असतात ते उद्या मोजून सांगतो
  •  एक किलो गहूमध्ये ८७९० दाणे  येतात, तांदळाचे उद्या सांगतो.
  •  डास मारण्याच्या बॅटला ८४५ चौकोन असतात.
  •  झिंगाट गाण्यात ९० झिंग आणि १२ झिंगाट आहेत.
  •  मारी बिस्किटावर २२ छिद्रे आहेत.