News Flash

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेशकुमार रेल्वे बोर्डात

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेशकुमार यांची रेल्वे बोर्डात सदस्य म्हणून नियुक्ती झाली असून त्यांनी गुरुवारी हा पदभार स्वीकारला. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक असताना चर्चगेट-विरार दरम्यान उपनगरी रेल्वेच्या

| May 3, 2013 03:26 am

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेशकुमार यांची रेल्वे बोर्डात सदस्य म्हणून नियुक्ती झाली असून त्यांनी गुरुवारी हा पदभार स्वीकारला. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक असताना चर्चगेट-विरार दरम्यान उपनगरी रेल्वेच्या विद्युतीकरणात केलेला बदल, चर्चगेट-डहाणू उपनगरी गाडी सुरू करणे आदी महत्त्वपूर्ण कामे कार्यान्वित करण्यात त्यांचा हातभार होता. १९७५ मध्ये रुडकीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. जुन्या दिल्ली स्थानकामध्ये अवघ्या ३६ तासांमध्ये रेल्वे मार्गातील रिले इंटरलॉकिंगची प्रणाली कार्यान्वित करण्याचे श्रेय महेशकुमार यांच्याकडे जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2013 3:26 am

Web Title: general manager of western railway mahesh kumar in railway board
टॅग : Railway Board
Next Stories
1 राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्यावर टीका
2 २००६ च्या स्फोटांमधील जखमी तरुणाचा मृत्यू
3 संतोष हांडे यांचे निधन
Just Now!
X