आपल्याला हवी असलेली माहिती मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये खेपा मारण्याच्या त्रासातून जनतेची लवकरच सुटका होणार आहे. राज्य माहिती आयोगाने एका योजनेनुसार यापुढे लोकांना माहिती अधिकाराच्या माध्यमातून हवी असलेली माहिती घरबसल्याच मिळणार आहे. यापुढे माहितीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. तसेच आयोगाच्या सुनावण्याही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.