07 August 2020

News Flash

एक कोटीचे लॅपटॉप चोरून गोदामाला आग

लॅपटॉप चोरी करण्यासाठी एका कंपनीच्या सुरक्षारक्षकाने चक्क गोदामालाच आग लावून तब्बल १ कोटी रुपयांचे लॅपटॉप लंपास केले. विशेष म्हणजे आगीत लॅपटॉपसह इतर साहित्य जळाल्याचा समज

| August 22, 2014 03:04 am

लॅपटॉप चोरी करण्यासाठी एका कंपनीच्या सुरक्षारक्षकाने चक्क गोदामालाच आग लावून तब्बल १ कोटी रुपयांचे लॅपटॉप लंपास केले. विशेष म्हणजे आगीत लॅपटॉपसह इतर साहित्य जळाल्याचा समज होऊन मालकांनी चोरीची तक्रार केली नव्हती. परंतु गुन्हे शाखा १२ च्या पथकाने या प्रकरणाचा तपास करून ही आग नसून चोरीचे नियोजनबद्ध षडयंत्र असल्याचे उघड केले. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भिवंडीच्या ओवीळ गावात ‘ग्लोबस कॉम्प्लॅक्स’ या कंपनीचे गोदाम होते. या गोदामातील सुरक्षा रक्षक लाला याने लॅपटॉप चोरण्यासाठी अनोखी शक्कल लढविली. त्याने गोदामातील नामांकित कंपनीचे २८० लॅपटॉप आणि मॉनिटर्स लंपास केले आणि गोदामाला आग लावली. आगीमुळे गोदाम जळून खाक झाल्याचे कंपनीच्या मालकाला वाटले होते. यामुळे लालाचा प्रयत्न यशस्वी झाला. लालाने टेम्पो चालक असलेले संतोष भोसले (३७) आणि मोहम्मद आलम (४०) यांच्या मदतीने हे लॅपटॉप नवी मुंबईच्या रबाळे येथील एका गोदामात लपवून ठेवले होते. तेथून ते विकायचा त्यांचा प्रयत्न होता. भोसले आणि आलम दहिसर येथे लॅपटॉप घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा १२ च्या पथकाला मिळाली. त्यानी सापळा लावून या दोघांना अटक केली आणि उर्वरित लॅपटॉप जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखा १२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले यांनी दिली. या आगीत गोदामातील २३ कोटी रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले होते. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून आणखी काही जणांना याप्रकरणी अटक होणार असल्याचे खेतले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2014 3:04 am

Web Title: godown fire after theft laptop costing rs one crore
टॅग Robbery
Next Stories
1 बसमध्ये क्षमतेपेक्षा किमान पाच प्रवासी जास्त घ्या!
2 ‘कॉमर्स’चे पेपर तपासण्यासाठी सर्वाधिक तरतूद; मात्र खर्च निम्माच!
3 प्रतिजैविकाच्या बाधेमुळे महिलेचा मृत्यू
Just Now!
X