मुंबईतील वाकोला येथील हवाई दलाच्या कार्यालयात सुरक्षा रक्षकाने आपल्या साथीदारांवर केलेल्या गोळीबारात दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला असून एक सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे. सोमदत्त आणि एस के सिंह अशी मृतांची नावं असून जखमी पिगबाहादूर थापाला वी. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
प्रवेशव्दारापाशी पहारा देणा-या वाय. एस. यादव या सुरक्षा रक्षकाने सोमवारी रात्री दीडच्या सुमारास खोलीमध्ये विश्रांती घेणा-या आपल्याच साथीदारांवर गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वनराई पोलिसांनी यादवला ताब्यात घेतले.
गोळीबाराचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.