गुलजारांनी स्वत: निवडलेल्या १०० गीतांचे पुस्तक लवकरच
गेली चार दशके आपल्या सुमधूर गीतांनी रसिकांच्या हृदयात अढळस्थानी असलेल्या कवी-गीतकार गुलजार यांच्या िहदी चित्रपट गीतांची जादू आता मराठी रसिकांना अनुभवता येणार आहे. गुलजारांनी स्वत: निवडलेल्या शंभर संस्मरणीय गीतांचे भावानुवाद केलेले एक वेगळे पुस्तक‘मेहता पब्लििशग हाऊस’तर्फे प्रकाशित होणार आहे.
या पुस्तकात ‘बंदिनी’ सिनेमासाठी लिहिलेले पहिलेवहिले गीत ‘मोरा गोरा अंग लई ले’पासून ते अगदी हल्लीच्या काळातील ‘जय हो’ या गुलजार-स्पर्शाने पुलकित झालेल्या भावमधूर काव्याचा प्रवास उलगडणार आहे. १९६३ सालापासून गेल्या ४० वर्षांत रसिकांच्या पसंतीस उतरलेली अजरामर गाणी पुस्तकात असणार आहेत. गुलजारांच्या सुमारे साडेतीन तीनशे लोकप्रिय गाण्यांपकी शंभर निवडक गीते संकलनासाठी समाविष्ट करण्यात आली आहेत. एकीकडे िहदी सिनेमाच्या सुवर्णयुगाची आठवण करून देताना सध्याच्या उत्तर-आधुनिक काळातल्या संवेदना अधोरेखित करणारी गुलजारांची गीते भारतीय भावजीवनाचा भाग झाली आहेत. त्यातील ‘मुसाफिर हुँ यारो’, ‘हमने देखी हैं उन आँखों कि महकती खुशबु’, ‘ए अजनबी’, ‘बितीना बिताई रैना’, ‘दौ ननों मे’, ‘नाम गुम जाएगा’, ‘दिल हुम हुम करे.’, ‘सीली हवा छु गई’, ‘कजरारे कजरारे..’, ‘जय हो.’, ‘ नणों की मत मातियों रे..’ अशा गुलजारांच्या सदाबहार गीतांनी नटलेले हे पुस्तक मार्चच्या पहिल्या आठवड्याच प्रकाशित होईल. ही गीते मराठी भाषेत आणण्याचा प्रयोग ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’कडून केला जात आहे.