मुंबईकरांची सोमवारची सकाळ उजाडली तीच मुळी मुसळधार पावसाच्या बातमीने. शनिवारपासून सुरु झालेल्या पावसाने रविवारी रात्री चांगलाच जोर धरला. २४ तासात मुंबईत २३१ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी चेरापुंजीत २२८ मिमी पावसाची नोंद झाली होती. मुंबईच्या पावसाने हा विक्रम मोडीत काढला.

सोमवारी सकाळी पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले होते. सखल भागात पाणी साचल्यामुळे नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी झाली तर सायन, कुर्ला येथे रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने रेल्वेचा वेगही मंदावला. रेल्वेला मुंबईची लाईफ लाईन म्हटले जाते. तिन्ही मार्गावरील रेल्वे सोमवारी सकाळी १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामावर येणाऱ्यांचे नोकरदारांचे हाल झाले. अनेकांनी पावसाचा रागरंग पाहून कामावर येण्याऐवजी सुट्टी घेणे किंवा घरातून काम करणे पसंत केले. बेस्टनेही मुंबईने पाणी साचल्यामुळे ४७ मार्गांमध्ये बदल केला होता.

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
mukhtar ansari death gangster turned politician buried near his parents graves in ghazipur
मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाचे दफन

जाणून घेऊया मुंबईच्या कुठल्या भागात किती पाऊस झाला
कुलाबा – ९९ मिमि
सांताक्रूझ – १८१ मिमि
कांदिवली – २३४ मिमि
गोरेगाव – १७५ मिमि
घाटकोपर – २१५ मिमि
सीएसटी – १८४ मिमि
मुलुंड -१९४ मिमि
माटुंगा -१९८ मिमि
माहिम/धारावी – १९१ मिमि
दहीसर – २४१ मिमि