घर घेणे ही सर्वासाठीच अत्यंत थकवणारी प्रक्रिया असते. त्यानंतरचा प्रवास मात्र फारच सुंदर असतो. घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हेत. घर घेतल्यानंतर सुरू होतो तो घराला घरपण देण्याचा प्रवास. आपण या सदरातून या प्रवासाविषयीच जाणून घेणार आहोत. आपलं घर आपल्या मनासारखं सजवण्यासाठीचे काही टप्पे..

  • इंटिरियर डिझायनर निश्चित करा. हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांचा अनुभव, काम करण्याची पद्धत, पूर्वी केलेल्या कामाची छायाचित्र पाहा. योग्य डिझायनर निवडल्यास तुमचा वेळ याची बचत तर होईल. डिलर्स, काँट्रॅक्टर्स आणि ग्राहक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे इंटिरिअर डिझायनर!
  • घराकडून आपल्या काय अपेक्षा आहेत, आपली आवड काय आहे, उदा. रंगसंगती, फर्निचरची धाटणी, घराचे एकंदर रूप याची जमल्यास एक फाइल तयार करा. त्यामुळे तुमच्या घराच्या सजावटीसंदर्भातील कल्पना स्पष्ट होतील.
  • तुमचे वास्तवदर्शी बजेट ठरवा. त्यामुळे खर्च अवाक्याबाहेर जाणे टाळता येईल.
  • काम सुरू करण्याची घाई करू नका. थोडा वेळ घ्या. बाजारात उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करा. यात डिझायनरची मदत होईल, कारण त्यांना अनेक पर्याय माहीत असतात.
  • घरात सध्या असलेल्या वस्तूंपैकी कोणत्या हव्या आहेत, कोणत्या टाकाऊ झाल्या आहेत, नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी किती आर्थिक तरतूद करावी लागेल, याचा अंदाज घ्या.

harshada.pawar@gmail.com