News Flash

इंद्राणीला डेंग्यू

इंद्राणी मुखर्जी हिची तब्येत बिघडल्याने जे जे रुग्णालयातील डॉक्टरांकडून तुरुंगात तपासणी करण्यात आली.

संग्रहित छायाचित्र

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला डेंग्यू झाल्याची शक्यता असून तब्येत ढासळल्याने तिला पुन्हा एकदा जे. जे. रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आले. यापूर्वी अशक्तपणामुळे बेशुद्ध पडल्यानेही तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

इंद्राणी मुखर्जी हिची तब्येत बिघडल्याने जे जे रुग्णालयातील डॉक्टरांकडून तुरुंगात तपासणी करण्यात आली. त्या वेळी तिच्या प्लेटलेट्सची संख्या ६५ हजारांवर उतरली होती. इंद्राणीची तब्येत खालावल्याने तिला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंद्राणीवर मुलगी शीना बोरा हिची २०१२ मध्ये हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने इंद्राणी, तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्यामवर राय याला ३१ ऑक्टोबपर्यंत कोठडी सुनावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 5:58 am

Web Title: indrani suspected to suffer from dengue
टॅग : Dengue
Next Stories
1 राणीबाग विस्तारासाठी ८० कोटींच्या भूखंडाची खरेदी?
2 डाळींचे साठे बाजारात आणण्याचा पेच ,सर्वसामान्यांना अजूनही दिलासा नाही
3 वर्ग दोन ते चतुर्थश्रेणी पदांची भरती लेखी परीक्षेतील गुणांवरच
Just Now!
X